चोरट्यांनी सोने-दागिने नाही तर, कोंबड्यांवर मारला डल्ला, कोल्हापुरातील शाहूवाडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 14:15 IST2023-06-14T14:13:26+5:302023-06-14T14:15:40+5:30

गेल्या अनेक दिवसापासुन शेतकऱ्यांच्या शेती साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

The thieves stole the hen, Incident at Shahuwadi in Kolhapur | चोरट्यांनी सोने-दागिने नाही तर, कोंबड्यांवर मारला डल्ला, कोल्हापुरातील शाहूवाडी येथील घटना

चोरट्यांनी सोने-दागिने नाही तर, कोंबड्यांवर मारला डल्ला, कोल्हापुरातील शाहूवाडी येथील घटना

अनिल पाटील 

सरुड : सरुड ( ता . शाहूवाडी ) येथील बिरदेव माळ परिसरात सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी ४३ कोंबड्या व ४० कोंबडीची पिल्ले तसेच ५० अंडी खुरुड्यासह चोरून लपांस केली आहेत.

याबाबत अधिक माहीती अशी सरुड येथील सुभाष रंगराव कुराडे व बळवंत तुकाराम कुराडे यांचे बिरदेव माळ परिसरात जनावरांचे शेड आहे. या शेडमध्येच त्यांनी कुक्कुटपालन केले होते. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सुभाष कुराडे यांच्या शेडमधील ३५ कोंबड्या दोन कोंबडे, ३० कोंबडीची लहान पिल्ली तसेच शेडमध्ये असणारी ५० अंडी खुरुड्यासह चोरून नेली.

याचवेळी बंळवत तुकाराम कुराडे यांच्या शेडमधीलही ५ कोंबड्या १ कोंबडा व १० पिल्ली चोरून नेली. मंगळवारी सकाळी सुभाष कुराडे जनावरांच्या शेडकडे गेले असता चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. 

गेल्या अनेक दिवसापासुन बिरदेव माळ परिसरात कोंबड्या व शेती साहित्य, खते चोरुन नेणारी भुरट्या चोरांची एक टोळी सक्रीय आहे. येथील अनेक शेतकऱ्यांच्या कोंबड्या व इतर शेती साहित्यावर या चोरट्यांच्या टोळीने डल्ला मारला आहे. शाहूवाडी पोलिसांनी येथील चोरींचा छडा लावुन या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Web Title: The thieves stole the hen, Incident at Shahuwadi in Kolhapur