शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

जागतिक ब्रदर्स डे : मित्र अन् सखा...भाऊ माझा पाठीराखा; कोल्हापूरच्या राजकीय विश्वात बंधूप्रेमाचा अनोखा 'बंध'

By पोपट केशव पवार | Updated: May 24, 2025 13:22 IST

स्वत: मागे राहत भावांच्या यशासाठी दिले पाठबळ

पोपट पवारकोल्हापूर : भाऊ लहान असो वा मोठा प्रत्येकासाठी आपला भाऊ हा भरभक्कम आधारच असतो. अगदी शालेय जीवनापासून ते करिअरपर्यंतच्या प्रवासात भावाची साथ मोलाची ठरते. अनेकजण स्वत: मागे राहत आपल्या भावासाठी सुखकर वाट करून देतात हा इतिहास आहे. त्याला राजकारणाचे क्षेत्रही अपवाद नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अशा अनेकांनी आपल्या भावासाठी त्याग केला आहे. आज २४ मेच्या ‘जागतिक ब्रदर्स डे’ निमित्ताने घेतलेला हा धांडोळा..आबिटकरांचे 'अर्जुनास्त्र'पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सलग तीनवेळा राधानगरी मतदारसंघातून विजय मिळवत जिल्ह्याच्या राजकारणात आपले स्थान भक्कम केले आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचे लहान बंधू अर्जून आबिटकर यांचा सिंहाचा वाटा आहे. मंत्री आबिटकर यांच्याकडे महत्त्वाचे आरोग्य खाते असल्याने त्यांना राज्याचा कारभार पाहावा लागतो. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक असलेल्या अर्जुन यांच्या खांद्यावरच मतदारसंघातील सारी धुरा आहे.

पाटलांचे बंधूप्रेमकाँग्रेसचा राज्याचा चेहरा म्हणून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या राजकीय वाटचालीत मोठे बंधू डॉ. संजय डी. पाटील यांची साथ मोलाची ठरली आहे. कोणत्याही निवडणुकीत थेटपणे समाेर न येता पडद्यामागून बळ देत त्यांनी सतेज पाटील यांची राजकीय कारकीर्द समृद्ध केली आहे. या दोन्ही बंधूंमधील प्रेम अन् जिव्हाळा अनेकदा जाहीर कार्यक्रमात पाहायला मिळतो. ‘बंटी माझं हार्ट आहे’ हे त्यांनी बोलून दाखवले आहे.

यड्रावकरांचा विजय म्हणजेच 'संजय'शिरोळ मतदारसंघातून सलग दोनवेळा विजय मिळवलेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गुलालाचा अर्थ त्यांचे लहान बंधू संजय पाटील-यड्रावकर यांच्या बंधुप्रेमात दडला आहे. 'भावासाठी कायपण' ही करण्याची तयारी असलेले संजय पाटील जयसिंगपूर नगरपरिषदेच्या राजकारणात सक्रिय असले तरी विधानसभेला थोरल्या भावासाठी जीवाचे रान करतात.

विनय-निपुण जोडी भारीपन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांच्या राजकारणाचा बाज सहकारक्षेत्र राहिला आहे. वारणेच्या सहकाराची समृद्ध परंपरा पुढे घेऊन जाण्याचे काम त्यांचे बंधू निपुण कोरे करत असून विनय कोरे यांच्या विजयाची ताकद निपुण यांच्या नियोजनात दडली आहे.

'चंद्रदीप' याचे गीत अजित‘करवीर’मधून तीनवेळा विजयश्री मिळविलेल्या चंद्रदीप नरके यांना लहान बंधू अजित नरके यांची नेहमीच साथ मिळाली आहे. करवीरच्या राजकारणात अजित नरके आपली मांड ठेवून आहेत.महाडिक बंधूंचा एकोपाकोल्हापूर दक्षिणमधून दोनवेळा गुलाल घेतलेले अमल महाडिक यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचे मोठे बंधू स्वरुप महाडिक यांची साथ लाभली आहे तर इचलकरंजी मतदारसंघातून पहिल्यांदाच रिंगणात उतरलेल्या राहुल आवाडे यांना गुलाल लावण्यात मोठे बंधू स्वप्निल आवाडे यांच्या जनसंपर्काचाही मोठा वाटा राहिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणPrakash abitkarप्रकाश आबिटकरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलVinay Koreविनय कोरेAmal Mahadikअमल महाडिक