शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Kolhapur News: पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी नवदाम्पत्य सरसावले, विवाह होताच जलपर्णी काढायला नदीत उतरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 11:57 IST

विवाह निश्चित झाल्यामुळे जलपर्णी काढण्याच्या मोहिमेत सहभागी झाले नव्हते. विवाह होताच दोघांनी पंचगंगा नदीपात्र उतरुन जलपर्णी काढली.

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील जलपर्णी हटवण्यासाठी गेल्या ६५ दिवसांपासून मोहीम सुरू आहे. त्यामध्ये सामाजिक संस्था माणुसकी फाउंडेशन महापालिकेच्या मदतीने आघाडीवर आहे. या संघटनेचे सदस्य कृष्णा इंगळे यांचा विवाह झाल्यानंतर नवदाम्पत्याने चक्क पंचगंगा नदीत उतरून जलपर्णी हटाव मोहिमेत योगदान दिले. याची चर्चा दिवसभर शहर परिसरात सुरू होती.मोहीम सुरू झाल्यापासून नियमित येणारे फाउंडेशनचे सदस्य कृष्णा यांचा विवाह निश्चित झाल्यामुळे विधीसाठी १० जूनपासून ते जलपर्णी काढण्याच्या मोहिमेत सहभागी झाले नव्हते. त्यामुळे १३ जून २०२३ रोजी विवाह झाल्यानंतर सर्वप्रथम श्री वरदविनायक गणपती मंदिर येथे गणरायाचे आशीर्वाद घेतल्यावर आपल्या नववधूला हा आपला मानस त्यांनी सांगितला. नववधू शिवानी यांनीदेखील कोणतेही आढेवेढे न घेता आपल्या साथीदाराला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार दोघांनी पंचगंगा नदीपात्र येथे येऊन जलपर्णी काढली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणmarriageलग्न