शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP 2026: अध्यक्षपद राष्ट्रवादीला शक्य; पाटील, फराकटे, डोंगळे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:16 IST

मुश्रीफ यांचा शब्दच अखेरचा ठरणार, गडहिंग्लज तालुक्याला आजपर्यंत कधीही अध्यक्षपद मिळालेले नाही.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नव्या सभागृहातील पहिल्या अध्यक्षा म्हणून राष्ट्रवादी (अजित पवार)कडून गिजवणे मतदारसंघातून निवडून आलेल्या शैलजा सतीश पाटील या प्रबळ दावेदार ठरू शकतात. पक्षाकडून या पदासाठी शोभाताई फराकटे, मानसी भोगण, अमृता डोंगळे, राजकुंवर गायकवाड या सदस्याही स्पर्धेत आहेत. अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवर्गातून निवडून आलेली सदस्या ही निवडणूक लढवू शकते.जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने मंत्री हसन मुश्रीफ हे कोणत्याही स्थितीत अध्यक्ष आपल्याच पक्षाचा करणार हे स्पष्ट आहे. त्यांच्या चिन्हावर २० व शिरोळमधील निवडणूकपूर्व युती झालेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू आघाडीच्या ४ जागा विजयी झाल्या आहेत. भुदरगडला आघाडीतून निवडून आलेल्या रेश्मा देसाई या आपल्याच आघीडाच्या असल्याचा दावा राष्ट्रवादीचा आहे.बहुमतासाठी ३५चा आकडा लागतो. त्यामुळे सत्तेसाठी त्यांना १० जागा कमी पडतात. ते महायुतीचे नेते असल्याने भाजप, शिंदेसेनेला सोबत घेऊन अध्यक्ष करू शकतात. कोल्हापूर महापालिकेत त्यांनी भाजप व शिंदेसेनेला सर्व मुभा दिल्याने जिल्हा परिषदेला मुश्रीफ आपला वरचष्मा ठेवतील हे स्पष्टच आहे.गिजवणेच्या शैलजा पाटील या कागल विधानसभा मतदारसंघातील आहेत. शिवाय त्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. तरुण नेतृत्व असून, त्या बी. कॉम., बी. एड. झाल्या आहेत. साई एज्युकेशन सोसायटीमध्ये त्या पदाधिकारी आहेत. त्यांचे पती सतीश पाटील हे मुश्रीफ यांचे खंदे कार्यकर्ते आहेत. गडहिंग्लज, आजरा चंदगड मतदारसंघातील पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. गडहिंग्लज तालुक्याला आजपर्यंत कधीही अध्यक्षपद मिळालेले नाही.त्यांच्याशिवाय राष्ट्रवादीकडून शोभा फराकटे, मानसी कल्लाप्पा भोगण, अमृता अरुण डोंगळे, राजकुंवर रणवीर गायकवाड यासुध्दा दावेदार ठरू शकतील, अशा सदस्या आहेत. फराकटे या कागल तालुक्यातील आहेत. भोगण या चंदगड तालुक्यातील असून, तिथे दोन्ही काँग्रेसने भाजपचा रथ रोखला आहे. अमृता डोंगळे या राधानगरी तालुक्यातून, तर गायकवाड या शाहूवाडी तालुक्यातून एकमेव जिंकल्या आहेत. भोगण, डोंगळे व गायकवाड या प्रथमच निवडून आल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP 2026: NCP Favored for Chairperson; Patil, Farakte in Discussion

Web Summary : NCP likely to secure Kolhapur ZP's chairperson post in 2026. Shailaja Patil, backed by Hasan Mushrif, is a strong contender. Other candidates include Shobhatai Farakte, Mansi Bhogan, and Amruta Dongle. All eyes are on the upcoming elections.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारHasan Mushrifहसन मुश्रीफMahayutiमहायुती