KMC Election Winners List 2026:कोल्हापूर महापालिकेत महायुतीने सत्तांतर घडविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. सर्वाधिक २७ जागा काँग्रेसने जिकल्या असल्या तरी भाजपने २६ जागा जिंकून जोरदार टक्कर दिली आहे. शिंदेने सेनेने १० जागा जिंकल्या असून, राष्ट्रवादीने (अजित पवार) तीन जागा जिंकल्या. जनसुराज्यनेही एक जागा जिंकून खाते उघडले आहे.प्रभाग क्रमांक एकमधून काँग्रेसचे उमेदवार सुभाष बुचडे, गीता जाधव, रुपाली पवार आणि सचिन हरिष चौगुले विजयी झाले. प्रभाग क्रमांक तीनमधून भाजपचे प्रमोद देसाई, वंदना मोहिते, राजनंदा कदम आणि विजेंद्र माने विजयी झाले. प्रभाग क्रमांक नऊमधील भाजपचे विजयसिंह देसाई, माधवी पाटील, शिंदेसेनेच्या संगीता सातव आणि शारंगधर देशमुख विजयी झाले.
वाचा : अक्षय जरग ठरला जायंट किलर, काँग्रेसमधून बाहेर पडत केला होता जनसुराज्यमध्ये प्रवेशप्रभाग क्रमांक १० मधील शिंदे सेनेचे अजय इंगवले, भाजपच्या अर्चना कोराणे यांचा विजय झाला. विशेष म्हणजे या प्रभागातून जनसुराज्यचे अक्षय जरग यांनी बाजी मारली.प्रभाग क्रमांक ४ मध्ये काँग्रेसचे स्वाती सचिन कांबळे, विशाल शिवाजी चव्हाण, दिपाली राजेश घाटगे, राजेश भरत लाटकर हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.
वाचा : कोल्हापुरात प्रतिष्ठेच्या लढतीत शारंगधर देशमुखांनी मारली बाजी, आमदार सतेज पाटील यांना धक्काप्रभाग क्रमांक १६ : काँग्रेस उमेदवार उमेश पवार, धनश्री कोरवी. भाजपचे उमेदवार पूजा पोवार, मुरलीधर जाधव विजयी.प्रभाग 6 मधून शीला सोनुले (शिवसेना) १०२०९, माधवी गवंडी (राष्ट्रवादी अजितदादा) ८६५२, दीपा काटकर (भाजप) ७८१४, प्रतापसिंह जाधव (काँग्रेस) ८५८७ मतांनी विजयी झाले.
Web Summary : In Kolhapur, Mahayuti advances towards power. Congress won 27 seats, BJP secured 26. Shinde's Sena got 10, NCP (Ajit Pawar) 3, and Jansurajya opened its account with 1 seat. Winners include Subhash Buchade, Pramod Desai, and Vijay Singh Desai.
Web Summary : कोल्हापुर में, महायुति सत्ता की ओर अग्रसर है। कांग्रेस ने 27 सीटें जीतीं, भाजपा ने 26 सीटें हासिल कीं। शिंदे की सेना को 10, एनसीपी (अजित पवार) को 3 और जनसुराज्य ने 1 सीट से खाता खोला। सुभाष बुचडे, प्रमोद देसाई और विजय सिंह देसाई विजेताओं में शामिल हैं।