शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बांधावर कृषीमंत्री दिसले नाहीत, सत्तेच्या वाटणीत महायुतीला रस; काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:55 IST

झोपलेल्या सरकारला विरोधी आघाडीने जागे केले

कोल्हापूर : मान्सूनपूर्व पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री व इतर कोणताही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर दिसला नाही. महायुतीच्या सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेच्या वाटणीत अधिक रस आहे, अशी टीका कँाग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली. विरोधी पक्ष म्हणून आम्ही झोपलेल्या सरकारला जागे करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.आमदार पाटील म्हणाले, राज्यात पावसाचा आठ दिवस अलर्ट होता. यावेळी सुरू असलेल्या कृषी सहायकांचा संपाकडे सरकारने दुर्लक्ष केले. डोक्यावरून पाणी वाहून गेल्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य केल्या.अवकाळी पावसामुळे सर्व उन्हाळी पीक वाहून गेली आहेत. त्याचे तातडीने पंचनामे करून मदत मिळाली पाहिजे. पावसामुळे मुंबईतील मेट्रो तीनची काय अवस्था झाली हे जगाने पाहिले आहे. काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल सत्यजीत तांबे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. इतकी वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणे योग्य नाही. वीस वर्षांचा माझा अनुभव आहे, आम्ही कधी फोन केला, तर राहुल गांधी यांची वेळ मिळाली नाही, असे झाले नाही.

जागतिक बँकेच्या प्रकल्पातून पूर कमी होणे अवघडआमदार पाटील म्हणाले, जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या निधीतून पूर नियंत्रणासाठीच्या उपाय योजनांचा आराखडा तयार केला आहे. यातून पूर कमी होणे अवघड आहे. पुराचे पाणी उपसून विदर्भाला देणेही अशक्य आहे. अलमट्टी धरण उंचीप्रश्नी बैठक झाली. त्याला विरोधातल्या एकाही आमदाराला बोलावले नाही. त्यामुळे आम्ही आज, गुरुवारी सकाळी महाविकास आघाडीचे आमदार सरकारला म्हणणे देणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वांची अस्मिताराष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्व सीबीएससी अभ्यासक्रमांमधून कमी करणे हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अभ्यासक्रमांमधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली पाहिजे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तारखेच्या वादात न पडता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahayutiमहायुतीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलFarmerशेतकरीElectionनिवडणूक 2024