Kolhapur: पगारवाढीच्या आमिषाने मुलीवर केला अत्याचार, दुकानमालकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 13:47 IST2024-09-19T13:46:47+5:302024-09-19T13:47:49+5:30

कोल्हापूर : नॉव्हेल्टी दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीस पगार वाढवून देण्याचे आमिष दाखवून दुकान मालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...

The girl was raped by the lure of salary increase Shop owner arrested in Kolhapur | Kolhapur: पगारवाढीच्या आमिषाने मुलीवर केला अत्याचार, दुकानमालकास अटक

Kolhapur: पगारवाढीच्या आमिषाने मुलीवर केला अत्याचार, दुकानमालकास अटक

कोल्हापूर : नॉव्हेल्टी दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीस पगार वाढवून देण्याचे आमिष दाखवून दुकान मालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी यासीर नासीर पटवेगार (वय ३१) आणि त्याची पत्नी रुकैय्या यासीर पटवेगार (३१ दोघे रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. यातील यासीर याला पोलिसांनी अटक केली.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मे २०२४ पासून यासीर पटवेगार याच्या लक्ष्मीपुरी येथील लुगडी ओळ परिसरातील नॉव्हेल्टी दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करीत होती. यासीर हा तिला पगार वाढविण्याचे आमिष दाखवून कपिलतीर्थ मार्केट येथील लॉजमध्ये घेऊन गेला. लैंगिक अत्याचार केल्याने पीडित मुलीने दुकानातील काम बंद केले.

मात्र, त्यानंतरही यासीर आणि त्याच्या पत्नीने पीडित मुलीच्या घरी जाऊन तिला दमदाटी आणि मारहाण केली. हा प्रकार जून ते १६ सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला. अखेर पीडित मुलीने तक्रार देताच पोलिसांनी संशयित यासीर पटवेगार याला अटक केली.

Web Title: The girl was raped by the lure of salary increase Shop owner arrested in Kolhapur