शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur-Ratnagiri Highway: अंकली-चोकाक रस्त्यासाठी महिनाअखेरपर्यंत मूल्यांकन, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:52 IST

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाहूवाडी येथे महामार्गाची पाहणी करून दुसरा व तिसऱ्या टप्प्यातील कामे मेअखेर पूर्ण करण्याची सूचना केली

कोल्हापूर : नागपूर- रत्नागिरीमहामार्गांतर्गत येत असलेल्या अंकली ते चोकाक या रस्त्यासाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनासाठीचे मूल्यांकन महिनाअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर चौपट मोबदल्याच्या निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम वर्ग केली जाणार आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाहूवाडी येथे महामार्गाची पाहणी करून दुसरा व तिसऱ्या टप्प्यातील कामे मेअखेर पूर्ण करण्याची सूचना केली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!नागपूर- रत्नागिरी महामार्ग कोल्हापुरातून जात आहे. पहिला टप्पा रत्नागिरी ते आंब्यापर्यंतचा आहे. पुढे आंबा ते पैजारवाडी, पैजारवाडी ते चोकाक आणि चोकाक ते अंकली, असे तीन फेज कोल्हापुरात होत असून, त्यासाठी लागणाऱ्या सर्व जमिनींचे संपादन पूर्ण झाले आहे. आंबा ते पैजारवाडी येथील काम ७१ टक्के, तर पैजारवाडी ते चोकाक इथपर्यंतचे काम ६५ टक्के पूर्ण झाले आहे. या दोन्ही फेजमधील महामार्गाच्या कामाची गती वाढवून ते मेअखेर संपवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.चोकाक ते अंकली येथील बाधितांच्या मागणीनुसार राज्य शासनाने चारपट मोबदला देण्याचे मान्य केल्याने तेथील जमिनींची मोजणीदेखील पूर्ण झाली आहे. सध्या त्यांचे मूल्यांकन सुरू असून, महिनाअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच बाधित खातेदारांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम वर्ग केली जाणार आहे.

दृष्टिक्षेपात महामार्गचोकाक ते अंकली हा महामार्ग ३३ किलोमीटरचा असून, यात चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले, निमशिरगाव, तमदलगे, जैनापूर, उमळवाड, उदगाव व अंकली, अशी दहा गावे या महामार्गावर येतात. चौपट मोबदल्यासाठी आंदोलनामुळे महामार्गाचे काम रखडले होते. बाधित शेतकऱ्यांना चौपट दर मिळणार असल्याने महामार्गाच्या कामाला गती येणार आहे. महामार्गावर ९३७ बाधित शेतकरी असून, जवळपास ६३ हेक्टर जमीन भूसंपादन होणार आहे. यामध्ये ५१४ बाधित गट आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur-Ratnagiri Highway: Ankli-Chokak Road Valuation by Month's End, Farmers to Receive Funds

Web Summary : Valuation for the Ankli-Chokak road land acquisition will be completed soon. Farmers will receive compensation based on the quadruple compensation decision. District Collector instructed to complete the second and third phases of highway work by May end, boosting project progress.