शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शाहू मिलमध्ये साकारणार टेक्स्टाइल टुरिझम हब, स्मारक; वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:41 IST

महापालिकेला आराखडा करण्याची सूचना

कोल्हापूर : छत्रपती शाहू मिलमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला, विचारांना साजेसे स्मारक आणि महाराजांच्या नावे टेक्स्टाइल टुरिझम हब (कापड पर्यटन केंद्र) निर्माण करण्यास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी गुरुवारी तत्त्वत: मंजुरी दिली. मिलमधील २६ एकरांपैकी ५ एकर जागा वस्त्रोद्योग विभागाला देऊन त्यामध्ये अर्बन हट अंतर्गत कोल्हापुरी चप्पल, साज, कापड उद्योग यांना एकाच छताखाली बाजारपेठ मिळवून दिली जाईल. उर्वरित २१ एकर जागेचा महापालिकेने एजन्सी नेमून आराखडा तयार करावा व त्यासाठी प्रशासनाने निधी खर्च करावा, अशीही सूचना त्यांनी केली.

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाकडे असलेल्या छत्रपती शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रस्तावित स्मारकासाठी जागेचे हस्तांतरण करण्याबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले. तसेच प्रधान सचिव अनुष्का सिन्हा, नगर विकास विभागाच्या सुशीला पवार, वस्त्रोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्ण पवार, उपसचिव तुषार पवार, वस्त्रोद्योग महामंडळाचे आयुक्त संजय दैने, सामान्य प्रशासन विभागाचे अव्वर सचिव रामदास कोळेकर उपस्थित होते.

पालकमंत्री आबिटकर यांनी स्थानिक पातळीवर प्रकल्प खर्चाला मर्यादा असल्याने नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत मिलचा विकास करावा, असे सांगितले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती ताराराणी यांचे स्मारक व संग्रहालय, कापड उद्योगाचा इतिहास, जुनी यंत्रसामग्री, शाहू मिल म्युझियम, टेक्स्टाइल इंजिनिअरिंग कॉलेज, इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, फॅब्रिक डिझाइन, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपट महोत्सवांसाठी अत्याधुनिक एक हजार आसन क्षमतेचे ऑडिटोरीयम, संगीत विद्यालय, कोटीतीर्थ तलावाकडील बाजूचे सुशोभीकरण, अम्युझमेंट पार्क करावे अशी सूचना मांडली. आमदार महाडिक यांनी, केंद्र शासनाच्या विविध संस्थांच्या माध्यमातून जागा विकसित करण्यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू असून, मार्चनंतर आढावा घ्यावा, अशी मागणी केली.

चिमणीचे जतन

मंत्री सावकारे यांनी मिलमधील "चिमणी" कोल्हापूरच्या औद्योगिक क्रांतीची आणि वैभवशाली इतिहासाची एक महत्त्वाची खूण आहे. या चिमणीला कोणताही धक्का न लावता तिचे मूळ स्वरूप जपून संवर्धन करण्याचे, तसेच मिल्समधील कामगार संघटनेच्या घरकुलासाठी २००० मीटर जागा देण्याची सूचना केली.

कृती समितीने वेधले लक्ष

शाहू मिल पुन्हा सुरू करावे या मागणीकडे पुन्हा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी कृती समितीने मिलच्या दारात बैठक घेतली. मिलमध्ये सूत गिरणी पुन्हा उभारावी यासाठी निरंतर चळवळ केली जाईल. पुढील टप्प्यात तालमींमध्ये जागरण बैठका, प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Shahu Mill to Become Textile Tourism Hub and Memorial

Web Summary : Shahu Mill in Kolhapur will transform into a textile tourism hub and memorial honoring Rajarshi Shahu Maharaj. The project includes a textile market, museum, and cultural center, preserving the mill's chimney and aiding worker housing.