शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
2
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
3
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
5
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
6
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
7
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
8
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
9
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
10
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
11
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
12
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
13
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
14
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
15
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
16
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
17
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
18
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
19
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
20
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
Daily Top 2Weekly Top 5

दहा वाळू वाहतूक परवाने रद्द

By admin | Updated: July 5, 2015 00:51 IST

अवैध वाहतूक : तहसीलदारांकडून ‘आरटीओं’ना सूचना

कोल्हापूर : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करून दंड न भरणाऱ्या दहाजणांचे वाहतूकपरवाने रद्द करण्याची सूचना, करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांनी शनिवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) लक्ष्मण दराडे यांना केली. यावर लवकरच कार्यवाही होऊन परवाने रद्द होण्याची शक्यता आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात शुक्रवारी करवीर तहसीलदार कार्यालयाने धडक कारवाई केली. कळंबा, सरनोबतवाडी, कुडित्रे या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणारे नऊ ट्रक, मुरूम वाहतूक करणारा एक ट्रक व चार ट्रॅक्टर-ट्रॉली पकडण्यात आल्या. यातील दोघांनी प्रत्येकी ३० हजार रुपये दंडाची रक्कम भरल्याने त्यांच्यावर पुढील कारवाई होणार नाही. परंतु, दहाजणांनी ही रक्कम न भरल्याने त्यांचे वाहन परवानेच रद्द करावेत, अशी लेखी सूचना तहसीलदार डॉ. खरमाटे यांनी ‘आरटीओ’ दराडे यांंना केली आहे. सचिन वैजनाथ वावळे (रा. हेर्ले, ता. हातकणंगले), तानाजी भीमा शिंदे (रा. जक्राटी, अथणी, जि. बेळगाव), संजयसिंग राजपूत (रा. कऱ्हाड, जि. सातारा), विश्वनाथ सूर्यवंशी (रा. कऱ्हाड, जि. सातारा), बशीर मौला शेख (रा. टेंबलाईवाडी, कोल्हापूर), प्रशांत देसाई (रा. फुलेवाडी, कोल्हापूर), राजू कोळी (रा. टोप, ता. हातकणंगले), भीमराव धोंडी पाटील (रा. वाकरे, ता. करवीर), पांडुरंग परशराम तोडकर (रा. बालिंगा, ता. करवीर), संजय शामराव चौगले (रा. वाकरे, ता. करवीर)अशी वाहनचालक व मालकांची नावे आहेत. या वाहनधारकांना अनधिकृतपणे वाळू वाहतूक करीत असताना मंडल अधिकाऱ्यांनी पकडले. त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये ही वाहने जप्त करण्यात यावीत. तसेच त्यांचा वाहतूक परवाना रद्द करण्याची व नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, असे तहसीलदारांनी ‘आरटीओं’ना केलेल्या लेखी सूचनेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)