शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

इमारत भाडेकरार वादातून पाडले दात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:25 IST

नवे पारगाव : इमारत करार वादातून नवे पारगाव (ता.हातकणंगले ) येथील इंदुमती सर्व्हिसिंग सेंटरसमोर सुनील निवृत्ती गायकवाड (रा. ऐतवडे ...

नवे पारगाव : इमारत करार वादातून नवे पारगाव (ता.हातकणंगले ) येथील इंदुमती सर्व्हिसिंग सेंटरसमोर सुनील निवृत्ती गायकवाड (रा. ऐतवडे खुर्द, ता.वाळवा, जि.सांगली) यांना शिवीगाळ करून दोन दात पाडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आनंदराव वसंतराव सरनाईक (रा. वारणानगर, ता.पन्हाळा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. वडगाव पोलिसांत नोंद झाली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, सुनील गायकवाड यांनी वारणानगर येथील वारणा सहकारी बँकेशेजारी असणारी आनंदराव सरनाईक याची इमारत भाड्याने घेऊन पृथ्वी सायन्स अकॅडमी सुरू केली होती. गायकवाड व सरनाईक यांच्यात याबाबत भाडेकरार झाला होता. भाडेकरारावरून दोघांत वाद सुरू होता.

मंगळवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास सुनील गायकवाड हे नवे पारगाव येथील इंदुमती सर्व्हिसिंग सेंटरसमोर उभे राहिले होते. संशयित आरोपी आनंदराव सरनाईक आपल्या स्कार्पिओ गाडीमधून तेथे आला. सुनील गायकवाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. गायकवाड यांच्या तोंडावर जोरात ठोसा मारला असता त्यांचे दोन दात पडले. त्यांना गंभीर जखमी केले. दोन दिवसांत पैसे नाही दिले तर ठार मारीन, अशी धमकीही दिली.

वडगावचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खान अधिक तपास करीत आहेत.