शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँकेचे ‘रण’ तापल

By admin | Updated: November 13, 2014 00:00 IST

रणधुमाळी जानेवारीनंतर : आरोप-प्रत्योरापाच्या फैरी सुरूे

प्रविण देसाई - कोल्हापूर --कोट्यवधींची उलाढाल असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जानेवारीनंतर ही निवडणूक होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या जे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत, ते म्हणजे निवडणुकीचीच रंगीत तालीम आहे. शिक्षक संघटनांतील वर्चस्वाची लढाई ही बँकेच्या निवडणुकीतही येते. त्यामुळेच जे राजकारण संघटनांमध्ये होते तेच बँकेच्या निवडणुकीतही होणार असल्याने त्याची धरपकड आतापासूनच सुरू झाली आहे. बँकेत सत्ता असली की, संघटनेच्या राजकारणावरही पकड ठेवता येते म्हणूनच या निवडणुकीत जोरदार चुरस पाहावयास मिळते.या बँकेची राजकीय लढाई ही शिक्षक संघ की शिक्षक समिती अशी होत राहिली; परंतु बॅँकेच्या २००९ च्या निवडणुकीत शिक्षक संघ, शिक्षक समिती व पुरोगामी शिक्षक समिती, अशी तीन पॅनेल रिंगणात होती. संघ एकसंध राहिला व समितीत फूट पडल्याचा फायदा संघाच्या पॅनेलला झाला; पण आता होऊ घातलेल्या निवडणुकीत उलटे चित्र दिसत आहे. शिक्षक समितीतील राजेंद्र पाटील, कृष्णात कारंडे आणि पुरोगामीचे प्रसाद पाटील, भिवाजी काटकर हे एकत्र येण्याच्या तयारीत आहे, तर संघातील राजाराम वरुटे, नामदेव रेपे यांच्या विरोधात संभाजीराव थोरात यांना मानणारा विलास पाटील, एस. व्ही. पाटील यांचा गट मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. एकेकाळी राजकारणग्रस्त झालेली ही बँक राजाराम वरुटे अध्यक्ष झाल्यावर काही प्रमाणात सुरळीत आली. त्यांच्या सर्वसमावेशक कारभारामुळे सलग अध्यक्षपदाची संधी मिळाली. फेब्रुवारी महिन्यात विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली; परंतु नवीन सहकार प्राधिकरणामुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ मिळाली. त्यामुळे या संचालक मंडळाला जादा कालावधी मिळाला. जानेवारी २०१५ नंतर निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीला कोण रिंगणात उतरणार, किती पॅनेल तयार होणार, हे स्पष्ट झालेले नाही.