शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बॅँकेच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: February 24, 2015 00:57 IST

सुनील शिरापूरकर : नारायण परजणे करणार संचालकांवर जबाबदारी निश्चितीची कारवाई

कोल्हापूर : दि प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेची कलम ‘८८’ नुसार चौकशीचे आदेश सोमवारी जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दिले. राधानगरीचे सहायक निबंधक नारायण परजणे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली. ते संचालकांवर जबाबदारी निश्चितीची पुढील कारवाई करणार आहेत. बँकेच्या संचालक मंडळावरील कारवाई थांबविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते, पण विरोधकांनी हा विषय ताणून धरल्याने अखेर कारवाईची प्रक्रिया सुरू करावी लागली. बॅँकेच्या संचालकांनी मनमानी कारभार करत सव्वातीन कोटींची उधळपट्टी केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने विरोधी गटाने संचालक मंडळ बरखास्तीची मागणी केली होती, पण जिल्हा उपनिबंधकांनी कारवाई करण्यास दिरंगाई केल्याने थेट सहकारमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील यंत्रणा हलली. ‘८८’ नुसार चौकशी करून त्यानुसार संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी राधानगरीचे सहायक निबंधक नारायण परजणे यांची नेमणूक केली आहे, पण त्यांच्या नेमणुकीचे आदेश देण्यातही जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून दिरंगाई केली जात होती. अखेर सोमवारी परजणे यांना पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले. चौकशी अधिकारी रंजन लाखे व प्रदीप मालगावे यांच्या चौकशी अहवालातील मुद्यानिहाय फेरचौकशी करून संबंधितांचे म्हणणे घेतले जाणार आहे. तरलता राखण्याकडे बॅँक संचालकांनी दुर्लक्ष केल्याने २ लाख ४ हजाराचा दंड, कोअर बॅँकिंगप्रणाली निविदाविनाच, लाभांश वाटप, रिझर्व्ह बॅँकेची परवानगी न घेताच ए. टी. एम. सुरू, एकरकमी परतफेड योजनेत १७ लाखांचे नुकसान, निबंधकांची परवानगी न घेताच बॅँकेचा लूक बदलण्यावर लाखो रुपये खर्च, हे चौकशी अहवालातील प्रमुख मुद्दे आहेत. या मुद्द्यानुसार नारायण परजणे पुढील चौकशी व कारवाई करणार आहेत. संचालकांच्या चुकीच्या कारभारामुळे बॅँकेचे किती नुकसान झाले, ते निश्चित करून त्यानुसार संचालकांवर जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे समजते.