शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा जागा वाटपाची चर्चा दिल्ली अधिवेशनानंतर : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 12:56 IST

लोकसभेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होण्यावर राहूल गांधी आणि माझ्यामध्ये झालेल्या चर्चेत शिक्कामोर्तब झाले आहे. आता जागा वाटपाबाबतची चर्चा दिल्लीतील अधिवेशन संपल्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी दिली.

ठळक मुद्दे लोकसभा जागा वाटपाची चर्चा दिल्ली अधिवेशनानंतर : शरद पवारराष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल करणार चर्चा

कोल्हापूर : लोकसभेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होण्यावर राहूल गांधी आणि माझ्यामध्ये झालेल्या चर्चेत शिक्कामोर्तब झाले आहे. आता जागा वाटपाबाबतची चर्चा दिल्लीतील अधिवेशन संपल्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवारयांनी दिली.पवार म्हणाले, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी आणि माझी तीन वेळा बैठक झाली. त्यातून महाराष्ट्रात आघाडी करण्याबाबत एकमत झाले. मात्र जागा वाटपाबाबत अजून चर्चा झाली नाही. ही चर्चा दिल्लीतील अधिवेशन झाल्यानंतर सुरू होईल.

यामध्ये कॉंग्रेसकडून अशोक गेहलोत, अशोक चव्हाण तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल हे चर्चेमध्ये भाग घेतील. अगदीच यातून काही जागांबाबत मतभेद निर्माण झालेच तर ते आमच्या वरिष्ठांच्या पातळीवर सोडवले जातील असेही यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.देशपातळीवर भाजपच्याविरोधात एकच आघाडी करण्यासाठी खूप मर्यादा असल्याचे सांगून पवार म्हणाले, माझी याबाबतची सुचना वेगळी आहे. कारण देशपातळीवर आघाडी केल्यानंतर आमच्या पक्षाने ताकद नसलेल्या पंजाबमध्ये जागा मागणे उचित होत नाही. परंतू तशा मागण्या होतात आणि मग चर्चा पुढे जात नाही. त्यापेक्षा त्या त्या राज्यातील कॉंग्रेस आणि प्रादेशिक पक्षांनी एकत्र आल्यास प्रत्येक राज्यात एक मजबूत विरोधी आघाडी होईल असे माझे मत आहे.

नेता जाहीर करायला हरकत नाहीज्या त्या पक्षाने निवडणुकीआधी आपला नेते जाहीर करणे यात गैर काहीही नाही. कॉंग्रेसने जर राहूल गांधीं आमचे नेते म्हटले किंवा समाजवादी पक्षाने अखिलेश यादव आमचे नेते आहेत असे म्हटले तर त्यात वावगे काही नाही. पंतप्रधानपदाचा नेता हा निवडणूक झाल्यानंतर ठरत असतो. तोपर्यंत पक्षांनी आपल्या नेत्यांची नावे घेणे गैर नाही असेही पवार म्हणाले. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस