शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: उपसरपंचाकरवी पाच हजारांची लाच स्वीकारली, शिंगणापूरचा तलाठी जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:38 IST

दोघांनाही अटक : सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी दहा हजारांची मागणी

कोल्हापूर : खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी उपसरपंचाकरवी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिंगणापूर सज्जातील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी अटक केली.

तलाठी इरफान दिलावर सनदी (वय ४१, रा. शिवाजी कॉलनी, लाइन बाजार, कोल्हापूर) व उपसरपंच दीपक सदाशिव कांबळे (वय ४३), असे अटक केलेल्यांची नावे आहेत. कारवाईत तलाठी आणि उपसरपंच जाळ्यात सापडल्याने महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली.लाचलुचपत प्रतिबंधक प्रशासनाने सांगितले की, शिंगणापूर सज्जात अनेक दिवसांपासून सनदी तलाठी म्हणून काम करीत होता. यातील तक्रारदार हे खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी तलाठी कार्यालयात आले होते. दरम्यानच्या काळात तक्रारदार यांना उपसरपंच कांबळे याने तलाठीकडून नाव लावून घेण्यासाठी सुरुवातील दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती पाच हजार रुपये द्यावे, असे सांगितले. कांबळे यांनी सांगितलेल्या पाच हजार रुपयांच्या लाचेस तलाठी सनदी याने दुजोरा दिला. त्यांनी बेकायदेशीरपणे लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी केली. त्यानंतर पथकाने सापळा रचला. गुरुवारी शिंगणापूर तलाठी कार्यालयात तडजोडीची पाच हजार रुपये सनदी याच्यासाठी उपसरपंच कांबळे याने लाच म्हणून रंगेहाथ मिळाला. करवीर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सात आणि सात अ कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू आहे.

कार्यालयाची झडती...लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना सापडल्यानंतर तलाठी कार्यालयाची झडती घेण्यात आली. तलाठी सनदी आणि उपसरपंच कांबळे याची अंग आणि वाहन झडतीही घेण्यात आली. यावेळी लाच रक्कम दीपक कांबळे यांनी तक्रारदार यांना तलाठी कार्यालयाचे बाजूस असलेल्या रूममधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगितल्याचे समोर आले. पथकाने ड्रॉवरमधील लाच रक्कम आणि मोबाइल जप्त केले.

सायंकाळी उशिरापर्यंत घरझडती..लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून सायंकाळी उशिरापर्यंत आरोपीच्या शिंगणापूर आणि कोल्हापुरातील घरझडतीची प्रक्रिया सुरू होती.

लाचेची मागणी केल्यास संपर्क साधा...लाचेची अथवा अपसंपदेबाबत कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार करावी. उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या ९७६४१४०७७७, ९४०४३२१०६४ किंवा कार्यालय ०२३१-२५४०९८९, हेल्पलाईन क्रमांक १०६४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Village official, clerk arrested for accepting bribe for land record.

Web Summary : A village official and clerk in Shingnapur, Kolhapur, were arrested for accepting a ₹5,000 bribe to add a father's name to land records. Anti-Corruption Bureau laid the trap after a complaint. Searches are ongoing.