शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या टायरची घ्या मुलाप्रमाणे काळजी, नियमित हवा, देखभाल गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 10:35 IST

वारंवार टायर फुटून चारचाकींचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात टायरची योग्य ती काळजी न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. प्रमाणित दिलेल्या इतकीच हवा भरणे, ताशी ५० कि. मी.ची वेगमर्यादा पाळूनच वाहन हाकणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न भरणे, आदी प्रकारची काळजी घेतल्यास अपघात टाळता येतात, असे मत अभ्यासकांतून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देटायरची घ्या मुलाप्रमाणे काळजी, नियमित हवा, देखभाल गरजेची वेगमर्यादा ताशी ५० कि. मी. हवी

कोल्हापूर : वारंवार टायर फुटून चारचाकींचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात टायरची योग्य ती काळजी न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. प्रमाणित दिलेल्या इतकीच हवा भरणे, ताशी ५० कि. मी.ची वेगमर्यादा पाळूनच वाहन हाकणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न भरणे, आदी प्रकारची काळजी घेतल्यास अपघात टाळता येतात, असे मत अभ्यासकांतून व्यक्त होत आहे.बेळगाव येथे औरंगाबादहून गोव्याकडे जाण्यासाठी निघालेली चारचाकी टायर फुटून त्यातील सर्वच्या सर्व सातजण ठार झाले, अशा एक ना अनेक घटना राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी वारंवार घडत आहेत. एकूणच चारचाकी चालविणाऱ्यांच्या ऐरणीवर असलेल्या हा विषय आहे; त्यामुळे टायर हे चारचाकीचे महत्त्वाचे अंग आहे.

विशेष म्हणजे दीर्घ प्रवासासाठी जाताना वाहनांच्या टायर तपासणी आवश्यक आहे. यात हवा, व्हील अलायमेंट, टायरचे थ्रेड, आदींबाबत वाहन चालकाने जागरूक असणे गरजेचे आहे. तरच अपघात टाळता येऊ शकतात आणि वित्त व मनुष्यहानी टाळता येऊ शकते.काय करू नये

  1.  प्रवास करताना गाडीच्या क्षमतेपेक्षा जादा प्रवासी भरून प्रवास करू नये
  2.  एकसारखा दीर्घ प्रवास करू नये.
  3.  वाहन चालविताना खड्ड्यातून वेगाने जाऊ नये.
  4. ५० कि. मी. प्रतितासांपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवू नये.
  5.  टायरचे थ्रेड निघण्यास सुरुवात झाल्यानंतर किंवा तीन वर्षांपेक्षा अधिक काळचा टायर असल्यास तपासणी न करता प्रवास करू नये.
  6. टायर हार्ड झाल्यास प्रवास करू नये.
  7. चार चाकांपैकी एका चाकातील हवा कमी होते, असे जाणवल्यास वाहनचालकाने वाहन रस्त्याकडेला घेणे आवश्यक आहे. टायर फुटण्याअगोदर वाहनाचा चारपैकी एक कोपºयात दाब कमी झाल्यासारखा जाणवल्यास तत्काळ वाहन बाजूला घेणे.

टायरची काळजी अशी घ्या

  1. वर्षाला १० ते १५ हजार मैल प्रवास केल्यास टायर बदलणे गरजेचे आहे.
  2.  टायरमधील हवा नियमित तपासणे.
  3. टायरचे स्टड, थे्रड चांगले आहेत की नाही हे पाहणे.
  4. क्षमतेपेक्षा जादा भार वाहनांवर पडेल, असे कृत्य करू नये.
  5. नियमित व्हील अलायमेंट करावे.
  6. घाट, ओबडधोबड रस्त्यावरून प्रवास करताना वाहन काळजीपूर्वक चालविणे.
  7.  वाहनांची योग्य वेग मर्यादा पाळणे.
  8.  दीर्घ प्रवास करून आल्यानंतर वाहनातील टायरची हवा तपासून घेणे.
  9. ६०००-८००० कि. मी. प्रवास झाल्यानंतर टायर फिरवून बसविणे गरजेचे आहे.
  10.  पुढील टायर २० हजार मैल, तर मागील टायर ४० हजार मैल प्रवास झाल्यास बदलणे गरजेचे आहे.
  11. भाडे तत्त्वावर वाहन घेतल्यानंतर त्या वाहनातील टायर प्रथम तपासून प्रवासाला सुरुवात करणे.

महिन्यातून किमान एकवेळा तरी चारचाकी चालकाने वाहनांच्या सर्व टायर्स तज्ज्ञांकडून तपासून घेणे गरजेचे आहे. विशेषत: २० हजार मैल प्रवास झालेल्या टायरबाबत अधिक जागरूक असणे गरजेचे आहे. टायरमधील हवेचे प्रमाण योग्य ठेवणे अत्यावश्यक बाब आहे.- तुकाराम खोंदळ, टायर विक्रेते, कोल्हापूर 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर