शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

आळते : टेम्पो उलटून वळिवडेची महिला ठार

By admin | Updated: June 2, 2015 01:28 IST

दहा जखमी : ‘धुळोबा’ला जात असताना अपघात

हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) गावच्या हद्दीत रामलिंग डोंगराच्या पायथ्याशी बलोरो पिकअप टेम्पो उलटल्याने गौराबाई बापू शेळके (वय ६०, रा. वळिवडे, ता. करवीर) ही महिला जागीच ठार झाली. या टेम्पोतील अन्य दहाजण गंभीर जखमी आहेत. यामध्ये सहा महिला, तीन पुरुष, एका लहान मुलीचा समावेश आहे. हे सर्व आळते येथील धुळोबा देवालयाजवळ परडी सोडण्यासाठी चालले होते. हा अपघात सकाळी ११.३०च्या सुमारास झाला असून, सर्व जखमींवर हातकणंगले येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून व हातकणंगले पोलिसांतून समजलेली माहिती अशी, वळिवडे (ता. करवीर) येथील शेळके कुटुंंबीय नातेवाइकांना घेऊन आळते येथील धुळोबा देवालयाजवळ परडी सोडण्यासाठी चालले होते. त्या ठिकाणी जात असताना रामलिंग डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वळणावर त्यांची बलोरो पिक-अप टेम्पो उलटला. काल रात्री पडलेल्या वळवाच्या पावसाने रस्त्याच्या कडेचा भाग निसरट झाला आहे, त्यामुळे चालकाचा ताबा सुटला असावा, असे काही जखमींनी सांगितले. या अपघातामध्ये राजाबाई गणपती शेळके (वय ६५), बापू बाळू शेळके (७०), संतोष चंद्रकांत शेळके, शोभा रंगराव शेळके, आक्काताई आनंदा शेळके, मंगल रामचंद्र मेटकर, आबासो भाऊसो शिंदे. (सर्व रा. वळिवडे, ता. करवीर) शेवंता नवलाप्पा पडवले (६०, रा. सौंदलगा, ता. चिकोडी), मंगल अशोक गावडे (४०, रा. कोरगाव, ता. वाळवा) प्रणाली प्रधान धनगर (११, रा. लाटवडे) आदी जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. (प्रतिनिधी)