एस.टी गँगचा हॉटेल व्यावसायिकावर पाठलाग करुन तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 07:44 PM2021-04-08T19:44:28+5:302021-04-08T19:46:34+5:30

CrimeNews Kolhapur- पूर्ववैमनस्यातून एका हॉटेल व्यावसायिकाचा दुचाकीवरुन पाठलाग करुन त्याच्यावर तलवार, येडका व हॉकी स्टीकने प्राणघातलक हल्ला करुन ठार मारण्याचा प्रयत्न झाला. राजारामपूरी पोलिसांत १४ जणांवर गुन्हा नोंदवला असून सातजणांना अटक केली.

Sword attack on hotelier by ST gang | एस.टी गँगचा हॉटेल व्यावसायिकावर पाठलाग करुन तलवार हल्ला

एस.टी गँगचा हॉटेल व्यावसायिकावर पाठलाग करुन तलवार हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देएस.टी गँगचा हॉटेल व्यावसायिकावर पाठलाग करुन तलवार हल्लाशाहू टोल नाक्यानजीक घटना : सातजणांना अटक; हत्यार जप्त

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून एका हॉटेल व्यावसायिकाचा दुचाकीवरुन पाठलाग करुन त्याच्यावर तलवार, येडका व हॉकी स्टीकने प्राणघातलक हल्ला करुन ठार मारण्याचा प्रयत्न झाला. राजारामपूरी पोलिसांत १४ जणांवर गुन्हा नोंदवला असून सातजणांना अटक केली.

हा प्रकार शाहू टोल नाक्याजीक घडला. हल्यात सद्दाम अब्दुलसत्तार मुल्ला(वय ३१ रा. कन्हैया सव्हींसिंग सेटरनजीक, यादवनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला. हल्लेखोरांनी त्याच्या मोटारीचेही तोडफोड करुन नुकसान केले. हल्ला एस.टी. गॅगने केल्याची तक्रार जखमीने पोलिसांत दिली, त्यानुसार राजारामपूरी पोलिसांत १४ जणांवर गुन्हा नोंदवला असून सातजणांना अटक केली.

संशयितांची नावे अशी, ऋषीकेश उर्फ गेंड्या बाबासाहेब चौगुले, असू बादशाह शेख, अर्जून वीरसिंग ठाकूर (वय २३ रा. दौलतनगर), नितीन उर्फ बॉब दिपक गडीयाल, जव्वा उर्फ विराज विजय भोसले, पंडीत रमेश पोवार, प्रसाद जनार्दन सुर्यवंशी (वय २३ रा. दौलतनगर), सनद देशपांडे, विशाल प्रकाश वडार, साईराज जाधव, रोहिती साळोखे, तसेच इतर अनोळखी तिघेजण. यापैकी अर्जून ठाकूर व प्रसाद सुर्यवंशी यां संशयिताना पोलिसांनी शोध मोहीम राबूवन रात्रीच अटक केली.

Web Title: Sword attack on hotelier by ST gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.