शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वहिफणी कामगाराचा संशयास्पदरित्या मृत्यू

By admin | Updated: November 22, 2015 00:35 IST

इचलकरंजीतील घटना : चेहरा कुत्र्यांनी कुरतडला

इचलकरंजी : येथील यशोलक्ष्मी मंगल कार्यालयानजीक रिकाम्या जागेत पहाटेच्या सुमारास एका वहिफणी कामगाराचा मृतदेह आढळून आला. राजू नदाफ (वय ३५, रा. हनुमानगर-जवाहरनगर) असे मृताचे नाव आहे. मद्यसेवनाने लिव्हर खराब होऊन त्याचा मृत्यू झाला. तसेच मृतदेहाचा चेहरा भटक्या कुत्र्यांनी कुरतडला असावा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. शनिवारी पहाटे ५.३०च्या सुमारास एका व्यक्तीस परिसरातील मैदानातून जात असताना एक व्यक्ती पालथी पडली असल्याचे निदर्शनास आले. त्याने जवळ जाऊन पडलेल्या व्यक्तीस सरळ केले असता त्याचा विद्रुप चेहरा पाहून तो भीतीने पळून गेला आणि या प्रकाराची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संजय साळुंखे पथकासह दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची तपासणी आणि आसपासच्या नागरिकांकडे चौकशी केली. त्यावेळी एका व्यक्तीने हा मृतदेह राजू नदाफ यांचा असल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांनी नदाफ यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधत त्यांचा मुलगा अल्ताफ नदाफ याला घटनास्थळी आणले. त्यावेळी त्याने हा मृतदेह आपल्या वडिलांचा असल्याचे ओळखले. नदाफ यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याचे लिव्हर खराब होऊन मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र हा खून आहे की, घातपात? या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)