Kolhapur Crime: गंगावेश येथील महिलेचा बेडरुममध्ये संशयास्पद मृत्यू; मूलबाळ नसल्याने राहत होत्या एकट्याच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 18:25 IST2026-02-17T18:24:46+5:302026-02-17T18:25:01+5:30

उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने राखीव ठेवले 

Suspicious death of a woman in Gangavesh Kolhapur | Kolhapur Crime: गंगावेश येथील महिलेचा बेडरुममध्ये संशयास्पद मृत्यू; मूलबाळ नसल्याने राहत होत्या एकट्याच 

Kolhapur Crime: गंगावेश येथील महिलेचा बेडरुममध्ये संशयास्पद मृत्यू; मूलबाळ नसल्याने राहत होत्या एकट्याच 

कोल्हापूर : गंगावेशीतील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळ शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या उषा मारुती भिऊंगडे (वय ६९) यांचा राहत्या घरी बेडरूमध्ये संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. हा प्रकार सोमवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास निदर्शनास आला. उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने राखीव ठेवले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

लक्ष्मीपुरी पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उषा भिऊंगडे यांच्या पतीचे डिसेंबर २०२५ मध्ये निधन झाले. मूलबाळ नसल्याने त्या एकट्याच गंगावेशीतील त्यांच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. फुलेवाडी रिंगरोड येथे राहणारा त्यांचा पुतण्या परशुराम भिऊंगडे हा रोज त्यांना भेटून जात होता.

तब्येत बरी नसल्याने तो रविवारी रात्री त्यांना औषधे देऊन गेला होता. सोमवारी सकाळी तो कामानिमित्त शाहूवाडी तालुक्यात गेला होता. सकाळी दहाच्या सुमारास त्याने चुलतीच्या मोबाइलवर कॉल केला. मात्र, त्या फोन उचलत नसल्याने शेजाऱ्यांना फोन करून त्यांची चौकशी करण्याची विनंती केली. त्यावेळी शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता, त्या बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळल्या.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. घरातील सर्व दागिने आणि रोकड सुरक्षित होती. तसेच, वृद्धेच्या अंगावर कुठेही जखमा नव्हत्या. तरीही पोलिसांनी ठसेतज्ज्ञांना पाचारण करून काही वस्तूंवरील ठसे घेतले. लक्ष्मीपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली.

अहवालानंतर कारण स्पष्ट

झोपेत हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तरीही व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने राखीव ठेवले आहेत. त्याच्या अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कणेरकर यांनी दिली.

Web Title : कोल्हापुर: अपार्टमेंट में बुजुर्ग महिला मृत पाई गई; जांच जारी

Web Summary : कोल्हापुर में उषा भिऊंगडे, 69, अपने अपार्टमेंट में मृत पाई गईं। पति की मृत्यु के बाद वह अकेली रहती थी। उनके भतीजे ने, जो हर दिन उनसे मिलने जाते थे, उन्हें बेसुध पाया। पुलिस जांच कर रही है; परीक्षण परिणामों का इंतजार है।

Web Title : Kolhapur: Elderly Woman Found Dead in Apartment; Investigation Underway

Web Summary : Usha Bhiungade, 69, was found dead in her Kolhapur apartment. With no children, she lived alone after her husband's death. Her nephew, who visited daily, found her unresponsive. Police are investigating; the cause of death remains undetermined pending test results.