शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

थकीत ३६ कोटींसाठी सर्वोच्च न्यायालयात

By admin | Updated: August 14, 2015 00:35 IST

‘दौलत’च्या सभासदांचा प्रश्न : संघटनेचे अध्यक्ष विजयभाई पाटील यांची माहिती

चंदगड : चार वर्षांपूर्वी बेळगाव येथील सह्याद्री व नवहिंद सोसायटीने थकीत कर्जापोटी तक्रार केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याची साखर जप्त केली होती. या जप्त केलेल्या साखरेचे व्याजासह ३६ कोटी रुपयांची रक्कम ऊस उत्पादकांना मिळावी, यासाठी गुरुवारी दौलत सभासद संघटनेतर्फे सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्याची माहिती दौलत सभासद संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजयभाई पाटील यांनी दिली.१ फेब्रुवारी २०११ ते हंगाम संपेपर्यंतची साखर तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी आॅगस्ट २०११ मध्ये जप्त केली होती. त्यानंतर या साखरेची विक्री केल्यानंतर २७ कोटी ९४ लाख रुपये रक्कम आली होती. या रकमेवर दावा सांगत बेळगावच्या नवहिंद व सह्याद्री पतसंस्थांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.मात्र, त्यानंतर प्रक्रिया लांबल्याने ही रक्कम ऊस पुरवठादार शेतकरी, तोडणी-ओढणी वाहतूदार यांना अद्यापपर्यंत मिळालेली नाही. त्यांना ही रक्कम मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, प्रा. एन. एस. पाटील, अ‍ॅड. व्ही. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाने कॅप्टन गुंडोपंत कानडीकर (जंगमहट्टी), नारायण धामणेकर (मांडेदुर्ग), विष्णू आवडण (हलकर्णी), तुकाराम मुरकुटे (मुरकुटेवाडी) यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला.