भडगाव येथे तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:29 IST2021-08-12T04:29:56+5:302021-08-12T04:29:56+5:30

पोलीस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, पूजाचे कुटुंबीय भडगाव येथील बंदी वसाहतीत राहतात. तिचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते. रविवारी ...

Suicide of a young woman at Bhadgaon | भडगाव येथे तरुणीची आत्महत्या

भडगाव येथे तरुणीची आत्महत्या

पोलीस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, पूजाचे कुटुंबीय भडगाव येथील बंदी वसाहतीत राहतात. तिचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते.

रविवारी (८) सकाळी ती नेहमीपेक्षा उशिरा उठल्यामुळे आजी तिला रागावली‌. त्याचा राग मनात धरून तिने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर काही वेळाने तिला अस्वस्थ वाटू लागले.

त्यामुळे नातेवाइकांनी तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर सोमवारी (९) तिला गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात आणण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच मंगळवारी (१०) तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटोळे यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Suicide of a young woman at Bhadgaon