शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:26 IST

गारगोटी - हेदवडे ता. भुदरगड येथील विवाहिता काजल बाळासो कांबके हिने सासू आणि नवऱ्याच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास ...

गारगोटी - हेदवडे ता. भुदरगड येथील विवाहिता काजल बाळासो कांबके हिने सासू आणि नवऱ्याच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी आई हौसाबाई चंद्रकांत कांबळे यांनी भुदरगड पोलिसात तक्रार दिली आहे.

अधिक माहिती अशी, टिक्केवाडी ता. भुदरगड येथील हौसाबाई चंद्रकांत कांबळे यांची मुलगी काजल हिचे लग्न हेदवडे ता. भुदरगड येथील बाळासो आनंदा कांबळे याच्याशी जून २०२० मध्ये झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२० पासून काजल हिला तिचा नवरा बाळासो आनदा कांबळे व सासू मालूबाई आनंदा कांबळे हे दोघे लग्नामध्ये हुंडा का दिला नाही? आता माहेरहून एक लाख रुपये हुंडा घेऊन ये, अशी मागणी करून उपाशी ठेवणे, उपाशीपोटी शेतातील कामे करायला लावणे, अपमानास्पद वागणूक देणे, असे प्रकार सुरू केले. त्यानंतर मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करीत होते. त्यांचा छळ असह्य झाल्याने काजल हिने अगतिक होऊन मंगळवारी (दि १८) रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी ओढणीने गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला सासू मालूबाई, नवरा बाळासो हे जबाबदार असल्याची तक्रार हौसाबाई कांबळे यांनी दिली आहे. दरम्यान, या दोन्ही संशयित आरोपींना भुदरगड पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

लग्नाला अवघे एक वर्ष पूर्ण होण्याआधी लग्नाच्या अकराव्या महिन्यातच काजल हिने आपले आयुष्य संपविले.