शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदर मंडळ अस्तित्वात

By admin | Updated: November 10, 2014 23:59 IST

अध्यादेश जारी : संजयकाका, जाचक यांच्या नावांना कात्री

विश्वास पाटील- कोल्हापूर- महाराष्ट्र शासनाने आज, सोमवारीच काढलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ऊसदर नियंत्रण मंडळातून विशेष निमंत्रित म्हणून सांगलीचे खासदार संजयकाका पाटील व पृथ्वीराज जाचक यांच्या नावांना कात्री लावली आहे. आजच त्यांची या मंडळावर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती झाल्याचे जाहीर झाले होते; परंतु शासनाने त्यासंबंधीचा आदेश काढताना मात्र मंडळामध्ये त्यांच्या नावांचा समावेश झालेला नाही. त्यामुळे भाजपचे सरकार त्यांच्याच खासदारांचे नाव विसरले की, त्यांच्या नावाला कुणी कात्री लावली, अशी चर्चा आता सुरू होणार आहे.राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने महाराष्ट्र (कारखान्यांना पुरविण्यात आलेल्या) उसाच्या दराचे विनियमन अधिनियम २०१३ मधील कलम तीन मधील तरतुदीनुसार मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन केलेल्या ऊस नियंत्रण मंडळामध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासंबंधीचा आदेश (शासन निर्णय क्रमांक : ससाका-२०१४/ प्र.क्र.११४/२५-स ता. १० नोव्हेंबर २०१४ ) आजच या विभागाचे सहसचिव कविता पारकर यांनी काढला आहे. शासनाच्या संकेतस्थळावरही तो उपलब्ध आहे; परंतु त्यामध्ये खासदार पाटील व पृथ्वीराज जाचक यांची नावे नाहीत. आज दुपारीच खासदार राजू शेट्टी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या मंडळाबाबत चर्चा झाली होती व तातडीने त्याचा आदेश काढला जाण्याची मागणी शेट्टी यांनी केली होती. त्यानुसार आदेश तर निघाला; परंतु मुख्यमंत्र्यांच्या चर्चेवेळी या मंडळावर खासदार संजयकाका पाटील व स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते पृथ्वीराज जाचक यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिली होती. परंतु, प्रत्यक्षात ही संमती आदेशामध्ये उमटलेली नाही.शेतकऱ्यांचे प्रतिनिधीखासदार राजू शेट्टी (अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिरोळ जि. कोल्हापूर)रघुनाथदादा पाटील (अध्यक्ष, शेतकरी संघटना साखराळे, ता. वाळवा)रामनाथ शिवनाथ डोंगरे (रा. निमज, ता. संगमनेर, जि. अहमदनगर)पांडुरंग साहेबराव आव्हाड (रा.आव्हाड-शिरपुरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद)विठ्ठल नामदेव पवार (प्रसिद्धी प्रमुख व संघटना सरचिटणीस शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, पुणे)