स्वप्नाला कष्टाची जोड दिल्यास हमखास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST2021-04-04T04:25:14+5:302021-04-04T04:25:14+5:30

पालकमंत्री पाटील म्हणाले की, सुभाष यांनी कॉन्स्टेबल ते सहायक पोलीस निरीक्षकपर्यंतचा प्रवास मोठ्या कष्टाने केला आहे. पोलीस खात्यातील ...

Success is a dream come true | स्वप्नाला कष्टाची जोड दिल्यास हमखास यश

स्वप्नाला कष्टाची जोड दिल्यास हमखास यश

पालकमंत्री पाटील म्हणाले की, सुभाष यांनी कॉन्स्टेबल ते सहायक पोलीस निरीक्षकपर्यंतचा प्रवास मोठ्या कष्टाने केला आहे. पोलीस खात्यातील नोकरी सांभाळून दिवसाला सहा तास व्यायाम करून त्यांनी हे यश मिळवले आहे. १ ते ७ सप्टेंबर २०२१ दरम्यान मालदीव येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय 'मास्टर आशिया श्री-२०२१' आणि ८ ऑक्टोबर रोजी उजेबिकीस्तान येथे होणाऱ्या ‘मास्टर वर्ल्ड-२०२१’ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू. यावेळी ज्येष्ठ नेते महावीर अण्णा गाट, हुपरीचे उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, अमित गाट, अमजद नदाफ आदी उपस्थित होते.

फोटो : ०३०४२०२१-कोल-पुजारी

आेळी : पंजाब येथे झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मास्टर भारत श्री किताब पटकाविल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते रेंदाळचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयकुमार माळगे, अमित गाट, अमजद नदाफ, महावीर गाट उपस्थित होते.

Web Title: Success is a dream come true