शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्ष कक्ष कुलूपबंद

By admin | Updated: July 17, 2017 00:11 IST

उपनगराध्यक्ष कक्ष कुलूपबंद

गणपती कोळी । लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : येथील पालिकेतील उपनगराध्यक्ष कक्ष उपनगराध्यक्ष जवाहर पाटील आल्यानंतरच तेवढेच उघडले जाते. ते कक्ष सोडून गेले की, पुन्हा कुलूपबंद केले जाते. कक्ष हा पदाधिकाऱ्यांचा सन्मानाचा असलातरी शहरवासीयांच्या सेवेसाठीसुद्धा आहे. दिवसभर नगराध्यक्षांसह सर्व समित्या सभापती व विरोधी पक्षाच्या कक्ष जनतेच्या सोयीसाठी उघडा असतो. मात्र, उपनगराध्यक्ष कक्ष कुलूपबंद ठेवत असल्याने नगरसेवकांसह शहरवासीयांतून नाराजी व्यक्त होत असून, कक्ष बंद ठेवण्याचे नेमके गमक काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पालिकेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्वच समिती सभापती व विरोधी पक्षाचा कक्ष आहे. पदाधिकाऱ्यांना कामकाजासाठी सोयीचा व्हावा. भेटण्यासाठी आलेले कार्यकर्ते, नागरिकांना बसण्याची तसेच त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना कक्ष देण्यात आला आहे. सध्याचे उपनगराध्यक्ष कक्ष हा संस्थानकालीन इमारतीत आहे. जुने व शास्त्रोक्त पद्धतीने बांधकाम यामुळे हा कक्ष नैसर्गिकरीत्या वातानुकूलीत आहे. शिवाय हा कक्ष आल्हाददायक वाटत असल्याने प्रत्येक पदाधिकाऱ्यांना या कक्षाची ओढ असते. तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शहरवासीय कामानिमित्त पालिकेत आले असता या कक्षाचा तात्पुरता आसरा घेतात. त्यामुळे या कक्षाला विशेष महत्त्व आहे.हा कक्ष आपल्याला मिळावा, यासाठी पदाधिकारीही आग्रही असतात. या कक्षाच्या मागणीसाठी विरोधी पक्ष व सत्ताधाऱ्यांत काही महिन्यांपूर्वी भर पालिका सभेतच राडा झाला होता. मात्र, नगराध्यक्ष जयराम पाटील व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी शिष्टाई करून हा कक्ष उपनगराध्यक्षांना देऊन समेट घडविला होता.नगराध्यक्षांसह सर्वच समिती सभापतींचे व विरोधी पक्षाचे कक्ष येणारे कार्यकर्ते, प्रतिष्ठित मंडळी, शहरवासीयांच्या सोयीसाठी उघडे असते. मात्र, उपनगराध्यक्ष कक्ष उपनगराध्यक्ष पाटील येताच उघडले जाते व त्यांनी काम आटोपून निघून गेले की, पुन्हा कुलूपबंद केले जाते. पदाधिकाऱ्यांच्या हक्काचा कक्ष असला तरी नागरिकांच्या सोयीसाठीही आहे. असे असताना या कक्षाला कुलूपबंद ठेवण्याचे कारणच काय? असा सवाल काही नगरसेवकांसह शहरवासीयांना पडला आहे. त्यामुळे या प्रकाराची शहरातून उलट-सुलट चर्चा सुरू असून, नाराजीचा सूरही उमटत आहे.