शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मटका लाच प्रकरणी उपनिरीक्षक गुरव, पोलीस पोवारचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 13:20 IST

मटक्‍याच्या गुन्ह्यात लाच मागितल्याप्रकरणी पसार संशयित उपनिरीक्षक अभिजित गुरव व पोलीस कॉन्स्टेबल रोहित पोवार यांचा शोध सुरू आहे. आणखी काही पोलीस चौकशीच्या रडारवर आहेत. अटक संशयित पंटर रोहित सोरपला न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावल्याचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

ठळक मुद्देमटका लाच प्रकरणी उपनिरीक्षक गुरव, पोलीस पोवारचा शोध सुरू आणखी पोलीस रडारवर; पंटरला पोलीस कोठडी

कोल्हापूर : मटक्‍याच्या गुन्ह्यात लाच मागितल्याप्रकरणी पसार संशयित उपनिरीक्षक अभिजित गुरव व पोलीस कॉन्स्टेबल रोहित पोवार यांचा शोध सुरू आहे. आणखी काही पोलीस चौकशीच्या रडारवर आहेत. अटक संशयित पंटर रोहित सोरपला न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावल्याचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.मटक्‍याच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी व अटकेची कारवाई टाळण्यासाठी मटका व्यावसायिक तक्रारदारांकडे राजारामपुरी गुन्हेशोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव व पोलीस रोहित पोवारने लाचेची मागणी केली. पहिला २० हजारांचा हप्ता दिल्यानंतर दुसरा उर्वरित ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी पंटर रोहित सोरपला रंगेहाथ पकडले. पंटरसह उपनिरीक्षक गुरव, पोलीस पोवार या तिघांवर गुन्हा नोंदविला.दरम्यान, गुरव व पोवार हे दोघेही गुन्हा घडल्यापासून गायब आहेत. पोलिसांनी शनिवारी रात्रीच पोवार याच्या पीरवाडीतील घराची तातडीने झडती घेतली; पण तेथे काही संशयास्पद आढळले नसल्याचे उपअधीक्षक बुधवंत यांनी सांगितले; तर उपनिरीक्षक गुरव याच्या रुक्मिणीनगरातील घराला कुलूप असल्याने त्याची घरझडती घेता आली नाही.

हे संशयित दोघेही पोलीस रविवारी दिवसभर पोलीस ठाण्यातही हजर नव्हते; तसेच विभागातही हजर झालेले नाहीत. विभाग त्यांचा कसून शोध घेत आहेत.एक पोलीस, दोन पंटर रडारवरलाच प्रकरणातील मोबाईल संभाषण व चौकशीअंती आणखी एक गुन्हे प्रकटीकरणाची आवड असणारा एक पोलीस व दोन पंटर संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांनाही कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.चौकशीसाठी पुणे विभागाने पुढे यावे...लाच प्रकरणात उपनिरीक्षक संशयित आरोपी आहे. आणखी काही वरिष्ठ अधिकारी गुंतले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा खोलवर तपास करून, पाळेमुळे खोदून पर्दाफाश करण्यासाठी पुणे विभागानेही पुढे येण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर