विद्यार्थ्यांनो जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा : डॉ. डी .टी. शिर्के : संजय घोडावत विद्यापीठाचा दुसऱ्या पदवीदान सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:44+5:302021-02-05T06:58:44+5:30
कोल्हापूर : कौशल्य विकास हा शैक्षणिक क्षेत्रातील मूलभूत कणा आहे. विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन प्रकल्पाद्वारे समाजोपयोगी संशोधन ...

विद्यार्थ्यांनो जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा : डॉ. डी .टी. शिर्के : संजय घोडावत विद्यापीठाचा दुसऱ्या पदवीदान सोहळा
कोल्हापूर : कौशल्य विकास हा शैक्षणिक क्षेत्रातील मूलभूत कणा आहे. विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन प्रकल्पाद्वारे समाजोपयोगी संशोधन करावे व जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.
संजय घोडावत विद्यापीठाच्या दुसऱ्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत होते. यावेळी विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. एम. टी.तेलसंग, कुलसचिव डॉ. एन. के. पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीनिवास बाळकुंडी, श्री. पी. ए. देसाई, डॉ. यू. पी. जाधव, डॉ. ए. डी. सावंत, डॉ. आबिद सलाती, प्रा. संजयकुमार इंगळे, डॉ. वाय. एल. गिरी उपस्थित होते.
डॉ. शिर्के म्हणाले, संजय घोडावत विद्यापीठ आज आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपास आलेले विद्यापीठ आहे. पूर व कोविड यांसारख्या कठीण काळात या विद्यापीठाने समाजहित जोपासून आपल्या सामाजिक कार्याचा संदेश दिला आहे. या विद्यापीठाने विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दिग्गजांना एसजीयू आयकॉन पुरस्कार देऊन गौरविले आहे. येणाऱ्या काळात शिवाजी विद्यापीठाकडून लागेल ती मदत करू.
संजय घोडावत म्हणाले '' विद्यार्थ्यांना संकटाना सामोरे जाता आले पाहिजे. संधी व आव्हाने या गोष्टी यशाच्या राजमार्गातील कणा आहेत. विद्यार्थ्यांनी सकारात्मक अभिवृत्ती जपायला हवी तसेच आई-वडील व थोरामोठ्यांचा आदर करायला हवा, अभ्यासाबरोबर आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे. यशाला कोणताही शॉर्टकट नाही.
कुलगुरू डॉ. एम. टी. तेलसंग यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाचा वार्षिक अहवाल वाचून दाखविला. यावेळी विद्यार्थ्यांना पदवीप्रदान व विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मान करण्यात आला.
डॉ. स्नेहल शिंदे, डॉ. सुनंदा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. एन. के. पाटील यांनी आभार मानले.
--
फोटो नं : २४०१२०२१-कोल-संजय घोडावत विद्यापीठ
ओळ : संजय घोडावत विद्यापीठाच्या वतीने आयोजित दुसऱ्या पदवीदान समारंभात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व अध्यक्ष संजय घोडावत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. यावेळी विनायक भोसले, डॉ. एम. टी. तेलसंग, डॉ. एन. के. पाटील, डॉ. श्रीनिवास बाळकुंडी उपस्थित होते.
--