शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

साळोखेनगरमध्ये फलक फाडल्याने तणाव

By admin | Updated: May 5, 2015 01:10 IST

रास्ता रोको आंदोलन : एस.टी.वर दगडफेक; कोल्हापूर-राधानगरी मार्गावर वाहतूक ठप्प

कोल्हापूर : साळोखेनगरमधील तुळजाभवानी कॉलनी ते वाल्मीकीनगर दरम्यानच्या श्रीराम कॉलनी केएमटी बसथांब्याशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला डिजिटल फलक अज्ञातांनी फाडला. ही घटना रविवारी (दि. ३) रात्री अकरानंतर घडली. ती सोमवारी सकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली. या घटनेचे तीव्र पडसाद साळोखेनगर आणि साने गुरुजी वसाहत परिसरात उमटले. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी साने गुरुजी केएमटी बसथांब्यासमोर तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी संतप्त आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत नृसिंहवाडीहून राधानगरीकडे जाणाऱ्या एस. टी. बसची काच फुटली. ‘रास्ता रोको’मुळे कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, साळोखेनगरमधील वाल्मीकीनगर येथील जयभीम तरुण मंडळाने बुद्धजयंतीनिमित्त श्रीराम कॉलनी केएमटी बसथांब्याशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला डिजिटल फ लक लावलेला होता. रविवारी रात्री साडेदहापर्यंत हा फ लक सुरक्षित होता; पण मध्यरात्री अज्ञातांनी त्याचा निम्मा भागच कापून नेला होता. ही घटना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास कार्यकर्त्यांना समजली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सानेगुरुजी केएमटी बसथांब्यासमोर सकाळी नऊ वाजता घोषणाबाजीसह ‘रास्ता रोको’ केला. ही घटना समजताच शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते तसेच दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले. आंबेडकरांच्या जयजयकाराच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ ते दुपारी साडेबारापर्यंत रास्ता रोको केल्यामुळे कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील वाहतूक कोलमडली. आंदोलनादरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, लोकजनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले हे घटनास्थळी पोहोचले. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी संशयितांना चोवीस तासांत अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद आंदोलकांनी डॉ़ आंबेडकरांची प्रतिमा असलेला डिजिटल फ लक फ ाडणाऱ्या संशयिताविरुद्ध पोलिसांनीच फिर्याद दाखल करून घ्यावी, असा पवित्रा घेतला़ त्यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी कलम २९५ अन्वये अज्ञातांविरुद्ध फि र्याद दाखल केली आहे़ ...तर जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयावर मोर्चा याबाबत रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे म्हणाले, कार्यकर्त्यांनी बुद्धजयंतीनिमित्त लावलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या डिजिटल फलकाची विटंबना झाली आहे. ही घटना निषेधार्ह आहे. या घटनेतील संशयितांवर चोवीस तासांच्या आत कारवाई न केल्यास आज, मंगळवारी जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.(प्रतिनिधी)