शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
3
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
4
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
5
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
6
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
7
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
8
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
9
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
10
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
11
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
12
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
13
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
14
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
15
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
16
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
17
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
18
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
19
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
20
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘एलबीटी’बाबतची कारवाई थांबवा

By admin | Updated: December 9, 2014 23:52 IST

मुख्यमंत्र्यांचे आदेश : राजेश क्षीरसागर यांचे साकडे

कोल्हापूर : स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) व्यापाऱ्यांवरील अन्यायी कारवाई थांबवावी शिवाय एलबीटीप्रश्नी अधिवेशनात प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी व व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ यांची तातडीने बैठक घ्यावी, या मागणीचे निवेदन आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्यावर व्यापाऱ्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे होत असलेली कारवाई थांबवावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्गमित केले तसेच बैठकीबाबत तयारी दर्शविली.सभागृह कामकाजाच्या सुरुवातीस आमदार क्षीरसागर यांनी एलबीटीप्रश्नी पाँईट आॅफ इन्फरमेशन सादर केला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. एलबीटीविरोधात तत्कालीन सरकारशी चार वर्षे संघर्ष करत युती सरकारवर विश्वास ठेवत व्यापाऱ्यांनी उघडपणे भूमिका मांडली. एलबीटी रद्द करण्याबाबत शासन अनुकूल आहे. मात्र, महानगरपालिकांच्या उत्पन्नाचा पर्यायी स्रोत निश्चित होणे गरजेचे असल्याचे शपथविधीनंतरच्या पहिल्या बैठकीमध्ये आपण स्पष्ट केले आहे. पण, त्याबाबत अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाही.कारवाई विरोधात सांगलीमध्ये १५ डिसेंबरला व्यापाऱ्यांनी ‘आमरण उपोषण’ करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे सरकार सहकार्य हवे असल्यास कोल्हापूर, सांगली, सोलापूरमधील व्यापाऱ्यांवरील कारवाई ताबडतोब थांबवावी. एलबीटीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी निवेदनाद्वारे केली. (प्रतिनिधी)