शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय शिथिल करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:24 IST

कागल : राज्य सरकारने लॉकडाऊनबाबत घेतलेला निर्णयाबद्दल सर्वसामान्य जनता व ...

कागल : राज्य सरकारने लॉकडाऊनबाबत घेतलेला निर्णयाबद्दल सर्वसामान्य जनता व व्यापाऱ्यांच्यातून असंतोष निर्माण झाला आहे. शिवाय याबाबत संभ्रमावस्था आहे. सरकारने व्यापाऱ्यांना नियम, अटी घालून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. याबाबत तत्काळ निर्णय न झाल्यास व्यापाऱ्यांचा उद्रेक होईल. राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय शिथिल करावा, आपण स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष, भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केली.

मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी श्री घाटगे यांनी त्यांची भेट घेतली.

यावेळी चर्चा करताना श्री. घाटगे म्हणाले, लॉकडाऊन शक्यतेमुळे शेतकऱ्यांबरोबर कामगार, शेतमजूर, छोटे उद्योजक, कारागीर, बारा बलुतेदार व राज्यातील हातावर पोट भरणारा कामगार वर्ग, झोपडपट्टीमध्ये राहणारी जनता, कलावंत हातावर पोट असणारा वर्ग आता पुन्हा लॉकडाऊन लागला तर काय करायचं या चिंतेत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन ऐवजी इतर उपाययोजना वाढवून कोरोना प्रतिबंधाचे काम करावे अन्यथा लॉकडाऊन काळात या वर्गाला आर्थिक सहकार्य करावे,. सध्या परिस्थिती गंभीर बनली असून याकडे लक्ष दिले नाही तर लोकं रस्त्यावर उतरतील. मागील १ वर्षाचा कोविडचा काळ पाहता राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेत बदल करावयास हवा होता. डॉक्टर, परिचारिका, व्हेंटिलेटर बेडस्, हॉस्पिटल इत्यादीच्या संख्येत वाढ करणे अत्यावश्यक होते. लॉकडाऊन लावण्याची वेळ येणे हे शासनाचे अपयश आहे. शंभर टक्के लॉकडाऊन झाले तर छोट्या छोट्या धंदेवाल्यांचे फार मोठे नुकसान होणार असून सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होणार आहे.