Kolhapur: सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा, 'स्वाभिमानी'चे गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:14 IST2025-12-10T15:13:56+5:302025-12-10T15:14:51+5:30
दोन महिने मागणी करूनही खरेदी केंद्र सुरू न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Kolhapur: सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा, 'स्वाभिमानी'चे गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन
कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. सोयाबीन खरेदी सुरू करण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेतकरी सोयाबीनची पोती घेऊन प्रांत कार्यालयावर दाखल झाले असून दोन महिने मागणी करूनही खरेदी केंद्र सुरू न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
राज्य सरकारकडे सोयाबीन खरेदी करण्यास प्रस्ताव दाखल करूनही मान्यता देण्यात आली नसल्याने संतप्त शेतक-यांनी प्रांत कार्यालयावर सोयाबीन पोती विक्री करण्यास आणले आहेत. राज्य सरकारकडे बारदान खरेदी करण्यास पैसे नसल्याने व सोयाबीन खरेदी केल्यानंतर हमीभावाने शेतक-यांना पैसे देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसल्याने खरेदी केंद्र सुरू करण्यास टाळाटाळ करत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी केली.