शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

टीका-टिप्पणी टाळा, विकासावर बोला; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार यांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 15:50 IST

विरोधकांनी तयार केलेली प्रतिमा खोडून काढून तयारीला लागा

कोल्हापूर : मागे काय झाले? हे उकरत बसू नका. कोणी आरोप केले तरी पदाधिकाऱ्यांनी टीका-टिप्पणी टाळून विकास व योजनांवर बोलावे, असा सल्ला देत लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलणार म्हणून सरकारची प्रतिमा खराब केली होती; ती खाेडून काढून विधानसभेला सामोरे जा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ समन्वयक व पदाधिकाऱ्यांच्या रविवारी कोल्हापुरात आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. लोकसभा निवडणुकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा फटका पक्षाला बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वडीलधाऱ्यांचा अपमान होईल, असे बोलू नका, अशा शब्दांत अजित पवार यांनी महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना दम दिला.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्य सरकारने गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या घराघरापर्यंत पोहोचवाव्यात. लोकप्रिय योजनांमुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून दहा वेळेला राज्याचा अर्थसंकल्प आपण मांडल्याने पैशांची जोडणी कशी लावायची, हे चांगले माहीत आहे. विधानसभेला महायुतीबरोबर एकोप्याने काम करा. आपली खरी कसोटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आहे. आतापासूनच चांगली मशागत करा, पीक कोणते घ्यायचे हे त्यावेळी सांगू.पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विधानसभेला चार जागा घ्या. त्या सर्व निवडून आणण्याची शपथ घेतो. अजितदादांचा बदललेला लुक येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी प्रास्ताविक केले. शीतल फराकटे, आदिल फरास, आमदार राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मानसिंगराव गायकवाड, युवराज पाटील, भैया माने, प्रा. किसन चौगले, अनिल साळोखे, नितीन दिंडे, असिफ फरास, विकास पाटील-कुरुकलीकर, मधुकर जांभळे, संतोष पाटील, शिवाजी देसाई, आदी उपस्थित होते.

सरकार २४ तास जागे

सरकार २४ तास जागे राहून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री पहाटे चारपर्यंत काम करतात आणि आपण तेथून पुढे रात्री उशिरापर्यंत काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.मुश्रीफ हेच खरे श्रावणबाळहसन मुश्रीफ यांनी तीनशेहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार करून आणले. त्यांचे हे काम खरोखरच मोठे असून, ते गोरगरिबांचे खरे श्रावणबाळ असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री पवार यांनी काढले.

१७ ऑगस्टला बहिणींच्या खात्यात ओवाळणी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत बहिणींच्या खात्यात १७ ऑगस्टला प्रत्येकी तीन हजार रुपयांची ओवाळणी पाेहोच होईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.पक्षाचे कार्यक्षेत्र ‘कागल’च्या बाहेर वाढवा

‘कागल’, ’चंदगड’ पुरता पक्ष ठेवू नका, त्याच्याबाहेर कार्यक्षेत्र वाढवा. अनेक वर्षे पालकमंत्री पद मिळाले नव्हते. आता हसन मुश्रीफ आहेत. त्यामुळे पक्ष मजबूत करून ‘दोन्ही खासदार देणारा जिल्हा’ हे दिवस पुन्हा आणा, असे आवाहन पवार यांनी केले.सत्काराने पवार भारावलेजिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचा सत्कार उसाची मोळी, काठी आणि घोंगडे, घुळाची ढेप देऊन केल्यानंतर ते भारावले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024