शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

‘डिजिटल मोबाईल वायरलेस’चा प्रारंभ

By admin | Updated: April 10, 2015 00:37 IST

वेगाने संपर्क : जिल्ह्यातील सर्व पोलिसांना एकाचवेळी देता येणार संदेश

कोल्हापूर : पोलीस दलाची बिनतारी संपर्क व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरलेली ‘डिजिटल मोबाईल रेडिओ यंत्रणा’ जिल्ह्यात नुकतीच सुरू करण्यात आली. या यंत्रणेचा प्रारंभ पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. मोबाईलच्या युगात पोलिसांच्या बिनतारी संपर्काचे महत्त्व आजही अबाधित असून आपत्कालीनप्रसंगी भरवशाचे संपर्क साधन म्हणून या यंत्रणेकडे पाहिले जाते. एकाचवेळी जिल्ह्यातील सर्व पोलिसांशी वेगाने संपर्क करून संदेश पोहोचविण्याची क्षमता पोलिसांच्या बिनतारी संपर्क व्यवस्थेमध्ये आहे. अशावेळी स्पष्ट आवाज आणि कुठूनही संपर्क होणे या बाबींना महत्त्व असते. कोल्हापूर पोलिसांकडे नवीन डिजिटल संदेश वहन प्रणाली आल्यामुळे या दोन्ही बाबी साध्य झाल्या असून पोलिसांच्या बिनतारी संपर्क यंत्रणेने आता कात टाकली आहे. ही यंत्रणा कार्यान्वित होण्यापूर्वी पारंपरिक अ‍ॅनालॉग प्रणालीवरुन संदेशवहन होत होते. या यंत्रणेमध्ये अनेक त्रुटी होत्या. आवाज स्पष्ट नसल्याने अनेक वेळा पुन: प्रक्षेपण करावे लागत होते. त्याचबरोबर नॉईज असल्याने कॉल पुन्हा प्रक्षेपित करावे लागत होते. याप्रसंगी गृहपोलीस उपअधीक्षक किसन गवळी, उपअधीक्षक चंद्रकांत ढाकणे, अरुण डुंबरे आदींसह नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हायपॉवर डिजिटल यंत्रणा जिल्ह्यात कार्यान्वित झाल्याने पोलिसांची संपर्क यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे. ‘स्पष्ट आवाज आणि गोपनीयता’ या डिजिटल यंत्रणेच्या वैशिष्ट्यांमुळे संदेश वहन करणे सोपे झाले आहे. भविष्यात वॉकीटॉकीवरून मोबाईलसारखा मेसेज पाठवणे, कॉल करणाऱ्या व्यक्तीचे जीपीएस लोकेशन नियंत्रण कक्षात दिसणे, डेटा मेसेजिंग सुविधा पोलिसांसाठी उपलब्ध करणार आहेत. - डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक