शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

स्टार १२०८: सावधान, चायनीज खाल तर पोटविकार मोफत मिळवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST

कोल्हापूर : जिभेवर रेंगाळणारी चव आणि वासामुळे चायनीज पदार्थावर यथेच्छ ताव मारला जात असलातरी त्यातील अजिनोमोटोच्या अतिवापरामुळे हे ...

कोल्हापूर : जिभेवर रेंगाळणारी चव आणि वासामुळे चायनीज पदार्थावर यथेच्छ ताव मारला जात असलातरी त्यातील अजिनोमोटोच्या अतिवापरामुळे हे पदार्थ पोटासाठी सायलंट किलर ठरू लागली आहेत. त्यामुळे जिभेचे चोचले पुरवताना पोटाचे पुरते वाटोळे होत आहे, आतडे आणि यकृताचे गंभीर आजार होत असून, याकडे दुर्लक्ष होत आहे.

चायनीज पदार्थांचे प्रस्त फारच वाढले आहे. जागोजागी कोपऱ्या कोपऱ्यात दिसणाऱ्या चायनीज सेंटरवर गर्दी असतेच, शिवाय हॉटेलमध्येही चायनीज पदार्थ हमखास मागवून खाल्ले जात आहेत. कोणताही चायनीज पदार्थ अजिनोमोटोशिवाय तयार होऊ शकत नाही. पदार्थाची चव वाढवण्यासाठी ते वापरले जाते; पण अधिक प्रमाणात वापरल्याने पोटविकारांना आयते निमंत्रण मिळत आहे.

१) काय आहे अजिनोमोटो? (बॉक्स)

अजिनोमोटो हे मोनो सोडियम ग्लुटामेट नावाचे एक केमिकल आहे. याला ॲमिनो ॲसिडपण म्हटले जाते. मीठासारखे असते, अन्न रुचकर बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. विशेेषत: फास्टफूड असलेले चायनीज नुडल्स, सूप, बर्गर. पिझा यामध्ये जास्त वापर केला जातो. जगभरात १९०८ पासून या अजिनोमोटोचा आहारात वापर केला जात असल्याचे पुरावे सापडतात. पहिल्यांदा जपानमध्ये याचा वापर केला गेला. आता जगभरात त्याच्याशिवाय पान हलत नाही, अशी परिस्थिती आहे.

२) ...म्हणून चायनीज खाणे टाळा (बॉक्स)

अजिनाेमोटो हा एक सायलंट किलर आहे. याच अजिनोमोटोचे प्रमाण चायनीज पदार्थात जास्त वापरले जात असल्यामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते. हे वाढल्याने तीव्र डोकेदुखी, मळमळणे, उलटी अशी सुरुवातीची लक्षणे दिसतात. सतत हे पदार्थ खाल्ल्याने पोटातील आतडे व लिव्हरवर परिणाम होऊन त्याला इन्फेक्शन होणे, सूज येणे, कावीळ होणे आदी आजार वाढतात. लठ्ठपणा, निद्रानाश, उच्च रक्तदाब हेदेखील आजार जडतात.

३) तज्ज्ञ डॉक्टरांचा कोट

चायनीज पदार्थ खायला कितीही चांगले असले तरी ते पोटाला मारक आहे. त्यातील अजिनोमोटो हे रसायन तर शरीराला फारच घातक आहे. आतड्यावर, लिव्हरवर थेट परिणाम होत असल्याने लिव्हरला सूज येणे, डायरिया होणे, गंभीर प्रकारची कावीळ होणे याचा धोका असतो.

डॉ. दीपक पाटील, पोटविकार तज्ज्ञ, कोल्हापूर