जिल्ह्यासाठी तब्बल दोन हजार रेमडेसिविर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST2021-05-23T04:24:35+5:302021-05-23T04:24:35+5:30

कोल्हापूर : गेला महिनाभर ज्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला होता, त्याच इंजेक्शनची आता जिल्ह्यात मागणी ...

A staggering two thousand remedies for the district | जिल्ह्यासाठी तब्बल दोन हजार रेमडेसिविर

जिल्ह्यासाठी तब्बल दोन हजार रेमडेसिविर

कोल्हापूर : गेला महिनाभर ज्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला होता, त्याच इंजेक्शनची आता जिल्ह्यात मागणी घटली आणि पुरवठा वाढला आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल चार हजार इंजेक्शनचा पुरवठा नियंत्रण कक्षाकडे झाला आहे. पण आम्हाला आता एवढ्या इंजेक्शनची गरज नाही, त्यामुळे ती परत घ्या, असे फोन रुग्णालयांकडून येत आहेत.

कोरोनाच्या अतिगंभीर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची मात्रा दिली जाते. गेला दीड महिना या इंजेक्शनचा पुरवठा अत्यंत कमी होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना त्यासाठी जीवाचे रान करावे लागले आहे. अगदी काळ्या बाजारातून २५ ते ३० हजार रुपये मोजून हे इंजेक्शन खरेदी करण्यात आले. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच हे इंजेक्शन धोकादायक असल्याचे सांगितले आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात रेमडेसिविरचा पुरवठा वाढला आहे. पहिले दोन दिवस आठशेच्यावर, शुक्रवारी १,९०० तर शनिवारी २ हजाराहून अधिक इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे.

नियंत्रण कक्षाने मागणीनुसार इंजेक्शन रुग्णालयांना पाठविल्यानंतर दोन ते तीन रुग्णालयांनी आम्हाला आता एवढ्या इंजेक्शनची गरज नाही, असे कळवले आहे.

--

Web Title: A staggering two thousand remedies for the district