शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्या केल्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:21 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसवर होणाऱ्या दगडफेकीमुळे कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्याच बंद करण्याचा निर्णय एस. टी महामंडळाने ...

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसवर होणाऱ्या दगडफेकीमुळे कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्याच बंद करण्याचा निर्णय एस. टी महामंडळाने शनिवारी घेतला. त्यानुसार दुपारपासून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्या बंद झाल्या. दिवसभरात कोल्हापूर-बेळगाव मार्गावर २६ गाड्या धावतात. कागलपर्यंत कोल्हापूर आगाऱाच्या बसेस धावत असल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.

कर्नाटकातील एकाने महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात फलाटावर लावलेल्या कोल्हापूर-स्वारगेट(पुणे) बसवर दगडफेक केली. त्यात बसचे पंचवीस हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी एकनाथ सोमाण्णा हलगीकर यास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मध्यवर्ती बसस्थानकात शनिवारी सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी एमएच १३ सीए ७३६८ क्रमांकाची बस कोल्हापूर-स्वारगेट(पुणे) मार्गासाठी फलाटवर उभी होती. या दरम्यान संशयित हलगीकर याने खिशातून आणलेली दगडे बसच्या पुढील काचेवर फेकली. त्यात २५ हजारांचे नुकसान झाले. दगडफेक करणाऱ्या संशयिताला बसस्थानकातील अन्य चालक, वाहकांनी पकडून प्रथम आगारप्रमुखाच्या स्वाधीन केले. त्यानंतर महामंडळाच्या प्रशासनाने शाहूपुरी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. तत्काळ पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानकात धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या चारचाकीवर हल्ला केल्यानंतर महाराष्ट्र -कर्नाटक वाद पुन्हा उफाळला. त्यानंतर शुक्रवारी रात्री स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बससेवा बंद पाडली. या दरम्यान शिवसैनिकांनी मध्यवर्ती बसस्थानकात जोरदार घोषणाबाजी करीत कन्नड रक्षण वेदिकेच्या कृतीचा निषेध करीत प्रत्युत्तर दिले.

तोपर्यंत बससेवा बंद

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा उफाळला आहे. प्रत्येकवेळी दोन्ही राज्यांच्या बसेस आंदोलक टार्गेट करीत फोडतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन राज्य मार्ग महामंडळाच्या कोल्हापूर आगाराने जोपर्यंत वाद निवळत नाही, तोपर्यंत कर्नाटकात बससेवा सुरू करायची नाही, असा निर्णय घेतला आहे.

फोटो : १३०३२०२१-कोल-एस.टी.बस

आेळी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी एस.टी.बसवर कन्नडिगाने केलेल्या दगडफेकीत पुढील काचेचे नुकसान झाले.