शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिये नाक्यावर एसआरपीएफची अरेरावी

By admin | Updated: August 17, 2014 22:35 IST

वाहनचालकांवर टोलसाठी दबाव : पोलीस अधीक्षकांचा आदेश धाब्यावर; वाहनधारकांतून तीव्र संताप

कोल्हापूर : ‘मंत्र्यांना फोन करा, नाहीतर एस.पी.ना सांगा, कोणत्याही परिस्थितीत टोल हा द्यावाच लागेल,’ अशा भाषेत कसबा बावडा-शिये टोलनाक्यावर राज्य राखीव दलाची (एसआरपीएफ) अरेरावी सुरू असल्याचा अनुभव काल, शनिवारी वाहनधारकांना आला. टोल वसुलीबाबत पोलिसांनी हस्तक्षेप करू नये, असा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी दिलेला आदेश धाब्यावर बसवून राखीव दलाचे पोलीसच वाहनधारकांची गळचेपी करीत असल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. शिये टोलनाक्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहनधारकांना टोलसाठी वेठीस धरले जात आहे. कृती समितीच्या आवाहनामुळे टोल देणार नाही असे सांगणाऱ्या वाहनचालकांना नाक्यावरील स्थानिक कर्मचाऱ्यांकडून दादागिरीचे तसेच अपमानास्पद बोलण्याचे प्रकार घडत आहेत. याला विरोध केल्यास पोलिसच दबाव टाकत असल्याचा प्रकार होत असल्याने या नाक्यावर सातत्याने तणावाची परिस्थती बनत आहे.वास्तवीक नाक्यावरील कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच नाक्याच्या मालमत्तेची जबाबदारी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची आहे, असे स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. मात्र, राज्य राखीव दलाच्या ग्रुप क्र. १ (सेक्टर क्र. ३)च्या तुकडीने नाक्यावरील कर्मचाऱ्यांना टोलवसुलीसाठी मदत करण्याचा ठेकाच घेतल्याची परिस्थिती या नाक्यावर आहे. राखीव दलाचे सहायक पोलीस निरीक्षक व त्यांचे काही सहकारी टोल देण्यास नकार देणाऱ्या वाहनधारकांनाच दमदाटी करीत आहेत.काल सायंकाळी सात वाजता एका वाहनधारकाने टोल देण्यास नकार दिल्याने कर्मचाऱ्यांशी वादावादी सुरू झाली. यावेळी राखीव दलाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी वाहनधारकास टोल का देत नाही असे असे दरडावत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. तसेच एका कर्मचाऱ्यास गाडी काढून घेण्याचे फर्मान सोडले. यानंतर वाहनचालकाने थेट जिल्हा पोलिस प्रमुख मनोजकुमार शर्मा यांना फोन लावला. यावेळक्ष शर्मा यांनी त्यांची कानउघाडणी केली.इतका प्रकार घडूनही ोलीस कर्मचाऱ्यांनी ‘एस.पी.ला फोन कर, नाहीतर मंत्र्याला फोन कर. असे कितीतरी एस.पी. बघितले आहेत. पुन्हा येशील तेव्हा टोल नाही दिला तर गाठ आमच्याशी आहे,’ असा दम दिला. राखीव दलाच्या पोलिसांनी थेट एस.पीं.नाच आव्हान देण्याच्या प्रकाराने नाक्यावरील कर्मचारी व इतर वाहनधारकही अवाक् झाले. (प्रतिनिधी)घडलेल्या प्रकाराची जातीनिशी चौकशी करू. अशा प्रकारावेळी वाहनधारकांनी लेखी तक्रार द्यावी. पोलीस फक्त नाक्यांच्या संरक्षणासाठीच आहेत. टोलवसुलीत हस्तक्षेप करणार नाहीत. - मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक शिये नाक्यावर अरेरावीचे प्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. कर्मचारी व पोलिसांनी संयम राखावा. कोल्हापूरकरांच्या संयमाचा अंत पाहू नये. शिये नाक्यावरील प्रकारास आळा घालून त्यांना लवकरच अद्दल घडवू.- आमदार राजेश क्षीरसागर