शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

भावी शाहिरांकडून दिमाखदार सादरीकरण

By admin | Updated: November 11, 2014 00:12 IST

शाहिरी कला प्रशिक्षण शिबिर : सरवडेत आयोजन; ५५ विद्यार्थ्यांचा सहभाग

इचलकरंजी : शाहिरी कला प्रशिक्षण शिबिरांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी शाहिरीमधील विविध गीते व पोवाडे सादर केले. प्रशिक्षणासाठी सहभागी झालेल्या ५५ शिबिरार्थींमध्ये ३० विद्यार्थी प्राथमिक शाळेतील, २४ विद्यार्थी हायस्कूलमधील व एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा समावेश होता. हे शिबिर सरवडे (ता. राधानगरी) येथे अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद, शाहिरी व लोककला अकादमी, रोटरी क्लब टेक्स्टाईल सिटी व संभू-राजू आध्यात्मिक मंडळ यांनी आयोजित केले होते.सरवडे येथे दूधगंगा नदीकाठावर असलेल्या दत्त मंदिर कार्यालयामध्ये शिबिरार्थिंनी प्रात्यक्षिके सादर केली. महाराष्ट्राचे शाहीर आम्ही, शाहिरी मुजरा, स्त्री-भ्रूणहत्या विरोधी गीत, शेतकरी गीत, कोळी गीत, ऐतिहासिक पोवाडा, महात्मा फुले गौरव गीत, आदी प्रकारचे दिमाखदार सादरीकरण करण्यात आले. दरम्यान, शाहीर शीला पाटील-लोंढे यांच्या गणाने शिबिराच्या सांगता कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. शाहीर विजय जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संतोषी जांभळे, संजय रानमाळे यांची माहितीपर भाषणे झाली. यावेळी प्राथमिक व हायस्कूलमधील शिक्षक-शिक्षिका, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. शाहीर हिंदुराव लोंढे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)सरवडे (ता. राधानगरी) येथील शाहिरी कला-प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेल्या शिबिरार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबर शाहीर नामदेव निकम, शीला लोंढे-पाटील, विजय जगताप, सखाराम खोत व अन्य मान्यवर उपस्थित होते.