साहित्य चैतन्याचा झरा भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST2021-09-23T04:27:45+5:302021-09-23T04:27:45+5:30

पुरस्कार मिळाला म्हणजे मी फार काही मोठं केलंय की शिस्तीची आहे, असं काही नाही बरं का. आपल्यासमोर इतकी आमिषं ...

The source of literary consciousness part 2 | साहित्य चैतन्याचा झरा भाग २

साहित्य चैतन्याचा झरा भाग २

पुरस्कार मिळाला म्हणजे मी फार काही मोठं केलंय की शिस्तीची आहे, असं काही नाही बरं का. आपल्यासमोर इतकी आमिषं आहेत की त्यावर कंट्रोल ठेवणं हेच मोठं आव्हान असतं. अशा गाळात रुतलेली माझी होडी बाहेर निघण्यासाठी पुरस्कार महत्त्वाचा आहे. तुम्ही जे काम कराल त्याकडे लक्ष द्या, साधना करा. इतक्या वर्षात मला लोकांशी बोलता आलं...मग तो मंत्री असो किंवा गल्लीतला चहावाला.. अपंग व्यक्ती आपल्याच सुख-दु:खाच्या रिंगणात कोंडून राहतात. त्यांच्या यश-अपयशाबद्दल जाणीव-जागृती व्हावी, त्यांना स्वाभिमानाने जगता यावं, देशातील प्रगतीला पुरक नागरिक म्हणून सन्मान मिळावा, यासाठी काही करायची इच्छा आहे. मला जग फिरायचंय... छान स्वयंपाक बनवायला शिकायचंय...माझ्या हातून सुंदर दर्जेदार काम व्हावं, अशी इच्छा आहे. स्वत:चे अभिनिवेश मागे ठेवले की सगळ्या गोष्टी आपोआप सुटत जातात. फक्त तुमची इच्छा हवी. असं ती म्हणते. सोनालीने स्वकर्तृत्वाने आपले आकाश तयार केले आहे. ज्यात तिचा मुक्तछंद विहार सुरू आहे. तो असाच सुरू राहो, याच सदिच्छा...

-

फ्रेंडली होम..

सोनालीनं घर तिला सोयीस्कररित्या सगळ्या बाबी करता येतील, अशा पद्धतीने सजवून घेतलंय. तिच्या फेसबुक पोस्टनंतर हे घर पाहण्याची तीव्र इच्छा यानिमित्ताने पूर्ण झाली. ती स्वयंपाकापासून ते भांडी विसळण्यापर्यंत...घरातील विजेचे बटण बंद-चालू करू शकेल इतक्या खालीपर्यंत, घरभर व्हीलचेअर फिरेल, अशा रितीने बनवून घेतले आहे. वाचन, लेखन, टीव्ही, लॅपटॉप, बेड अगदी स्वच्छतागृहाचा वापरदेखील स्वत: करू शकेल, असे हे फ्रेंडली होम...

---

इंदुमती गणेश

---

Web Title: The source of literary consciousness part 2