मग महायुतीने फसवणूक केली का..?, राजू शेट्टी यांची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 18:14 IST2025-05-03T18:11:34+5:302025-05-03T18:14:00+5:30
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करणार असे अभिवचन महायुतीच्या वतीने देण्यात आले होते. मग, त्यांनी ...

मग महायुतीने फसवणूक केली का..?, राजू शेट्टी यांची विचारणा
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करणार असे अभिवचन महायुतीच्या वतीने देण्यात आले होते. मग, त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली का? हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करावे, असा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार अडकूर (ता. चंदगड) येथे कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिलेच नव्हते, असे म्हटल्यानंतर त्यावर शेतकरी संघटनांमध्ये पडसाद उमटू लागले आहेत. याबाबत शेट्टी म्हणाले, महायुतीने जाहीर केलेल्या वचननाम्यात शेतकरी कर्जमाफीसह शेतीमालाला हमीभावापेक्षा २० टक्के जादा अनुदान देऊ, असेही सांगितले होते.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले..?, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अजब प्रश्न
असे असताना उपमुख्यमंत्री पवार हे आम्ही आश्वासन दिलेच नव्हते, असे म्हणत असतील तर शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली का? असा सवालही शेट्टी यांनी केला.