स्नेहलता दीक्षित यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:30 IST2021-02-25T04:30:43+5:302021-02-25T04:30:43+5:30

कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, राजारामपुरी तेराव्या गल्लीतील स्नेहलता अरविंद दीक्षित (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Snehalta Dixit passes away | स्नेहलता दीक्षित यांचे निधन

स्नेहलता दीक्षित यांचे निधन

कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, राजारामपुरी तेराव्या गल्लीतील स्नेहलता अरविंद दीक्षित (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, नात, जावई, असा परिवार आहे. त्या निवृत्त शिक्षण उपसंचालक अरविंद दीक्षित यांच्या पत्नी होत. निधनानंतर त्यांचे नेत्रदान व देहदान करण्यात आले.

छाया घुले

कोल्हापूर : राजारामपुरी मातंग वसाहतीतील छाया रजनीकांत घुले (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. छायाचित्रकार उत्तम घुले यांच्या त्या मातोश्री होत.

जगन्नाथ सावेकर

कोल्हापूर : राजारामपुरी दहाव्या गल्लीतील जगन्नाथ सखाराम सावेकर (वय ६५) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.

नंदकुमार राऊत

कोल्हापूर : राजोपाध्येनगरातील नंदकुमार शंकर राऊत (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून असा परिवार आहे.

रमाकांत नाईक

कोल्हापूर : राजेंद्रनगर नवीन वसाहतीमधील रमाकांत काशीनाथ नाईक (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.

अनिल कुलकर्णी

कोल्हापूर : वांगी बोळातील अनिल शंकर कुलकर्णी-दिंडनेर्लीकर (वय ६७) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

प्रकाश शिंदे

कोल्हापूर :जुना बुधवार पेठ, ढिसाळ गल्लीतील प्रकाश हिंदुराव शिंदे (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

Web Title: Snehalta Dixit passes away