बेकायदेशीररीत्या गुटख्याची वाहतूक; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:35+5:302021-02-05T06:53:35+5:30
इचलकरंजी : रांगोळी (ता. हातकणंगले) येथे वाहनातून बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात येत असलेला गुटखा पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकाने ...

बेकायदेशीररीत्या गुटख्याची वाहतूक; एकास अटक
इचलकरंजी : रांगोळी (ता. हातकणंगले) येथे वाहनातून बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात येत असलेला गुटखा पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकाने पकडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून विविध कंपन्यांचा गुटखा, चारचाकी वाहन असा तीन लाख ६३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रमोद राजाराम पाटील (वय ३८, रा. लक्ष्मी कॉलनी, टेंबलाईवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे, तर जावेद चोकावे याच्याकडून गुटखा आणल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. बोरगाव (ता. चिकोडी) येथून मारुती सुझुकी इको (एमएच- ०९ ईयू- ९४०१) या वाहनातून महाराष्ट्रात गुटखा तस्करी होत असल्याची माहिती महामुनी यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार बोरगाव- रांगोळी मार्गाने येणाऱ्या या गाडीला बुधवारी (दि.२७) रात्री उशिरा रांगोळी परिसरात सापळा रचून पकडले. गाडी ताब्यात घेऊन तपासणी केली असता गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळला. त्यामुळे चालक प्रमोद याला अटक केली.
(फोटो ओळी) २८०१२०२१-आयसीएच-०४
रांगोळी (ता. हातकणंगले) येथे बेकायदेशीररीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या एकाला पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने अटक केली. तसेच मुद्देमालही जप्त केला.