शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजमध्ये आयकार्डऐवजी ‘स्मार्ट कार्ड’

By admin | Updated: July 7, 2015 01:07 IST

अभिनव उपक्रम : कौन्सिल आॅफ एज्युकेशन सोसायटीचा पुढाकार

प्रदीप शिंदे / कोल्हापूर पारंपरिक ओळखपत्रांऐवजी बारकोडसह नवे ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचा अभिनव उपक्रम कौन्सिल आॅफ एज्युकेशन सोसायटीतर्फे राबविला जात आहे. महाविद्यालयातील प्रवेशासह ग्रंथालयातील देवघेव अशा विविध ठिकाणी हे ‘स्मार्ट कार्ड’ वापरता येणार आहे. या उपक्रमामुळे वर्षभर ओळखपत्र सांभाळण्याच्या कटकटीपासून विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ओळखपत्र असणे सक्तीचे असते. हे ओळखपत्र काढण्यापासून ते वर्षभर जपून ठेवण्यापर्यंत विद्यार्थ्यांना चांगलीच कसरत होते. सध्या डिजिटलायझेशनचे युग आहे. त्याच दृष्टिकोनातून कोल्हापुरातील कौन्सिल आॅफ एज्युकेशन सोसायटीच्या तिन्ही शैक्षणिक शाखेत यावर्षीपासून महाविद्यालयात ओळखपत्रांऐवजी स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. हे स्मार्ट कार्ड विद्यार्थ्यांचा जोपर्यंत महाविद्यालयात प्रवेश आहे, तोपर्यंत ग्राह्य धरले जाणार आहे. तसेच दरवर्षी ओळखपत्र, ग्रंथालय कार्ड काढण्याची गरज नाही. जशी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, तसे त्यांचे नूतनीकरण केले जाणार आहे. भविष्यात या स्मार्ट कार्डद्वारे विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरीही घेण्याचा प्रस्ताव आहे. ६६६.२ँ्र‘२ँंल्ल.ल्ली३ वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी आपली संपूर्ण माहिती भरून कोणत्याही ठिकाणाहून नोंदणी करू शकतो. सर्व माहिती भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट फक्त महाविद्यालयात जमा करायची आहे. या प्रिंटद्वारे विद्यार्थ्याची सर्व माहिती घेऊन त्याला स्मार्ट कार्ड दिले जाईल. या स्मार्ट कार्डद्वारे विद्यार्थी ग्रंथालयातील पुस्तके घेऊन जाऊ शकतो तसेच विद्यार्थ्यांना ग्रंथालयात कोणती पुस्तके आहेत, कोणते पुस्तक जमा झाले याची माहितीसुद्धा वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. त्याचे काम सध्या सुरू असून यासाठी कॉर्मस कॉलेज ग्रंथालयाचे ग्रंथपाल तानाजी कांबळे व संग्राम रजपूत हे काम पाहत आहेत. विद्यार्थ्यांची घेणार बायोमेट्रिक हजेरी महाविद्यालयात प्रथम आम्ही सर्व ग्रंथालयातील पुस्तकांचे डिजिटलायझेशन केले आहे. त्यामध्ये ग्रंथालयातील ३५ हजार पुस्तकांचा समावेश आहे. त्याच्या पुढचे पाऊल म्हणून यावर्षीपासून महाविद्यालय ओखळपत्र हे ‘स्मार्ट कार्ड’ रूपात दिले जाणार आहे. त्यापुढे जाऊन या स्मार्ट कार्डद्वारेच विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिकद्वारे घेण्यात येणार असल्याची माहिती कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य एस. बी. पाटील यांनी दिली. यांचा समावेश.... कौन्सिल आॅफ एज्युकेशन सोसायटीच्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेज, शहाजी लॉ कॉलेज, नाईट कॉलेज आॅफ आर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्समधील सुमारे चार हजार ६०० विद्यार्थ्यांसह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही हे स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे.