शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीत चोरट्याने पैशासोबत नेले चप्पल, बूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST

कोल्हापूर : येथील वर्षानगरमध्ये संभाजी हौसिंग सोसायटीमध्ये चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून ५८ हजारांची घरफोडी केली. या घरफोडीत ४० ...

कोल्हापूर : येथील वर्षानगरमध्ये संभाजी हौसिंग सोसायटीमध्ये चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून ५८ हजारांची घरफोडी केली. या घरफोडीत ४० हजारांच्या रोकडसह चांदीची नाणी आदी साहित्य लंपास केले. ही घटना सोमवारी घडली. याबाबत विक्रम नारायण सरनाईक (४१ रा. सध्या वर्षानगर. मूळ रा. वरुणतीर्थ वेश, शिवाजी पेठ.) यांनी चोरीची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विक्रम सरनाईक हे शिवाजी पेठेतील मूळचे रहिवासी असले तरीही ते वर्षानगरात संभाजी हौसिंग सोसायटीत राहतात. सोमवारी सकाळी ११.३० ते रात्री ११.३० वाजेपर्यंत ते सहकुटुंब घरगुती कामामुळे बाहेर होते. रात्री घरी परतले त्यावेळी त्यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील वरच्या मजल्यावरील बेडरूममधील लाकडी कपाटाचे दार उघडून आतील स्टीलच्या डब्यात ठेवलेली ४० हजारांची रोकड, १० हजारांची चांदीची नाणी, तसेच १० हजार रुपये किमतीचे शूज, २२०० रुपयांचा चपलेचा जोड, असा ५८ हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत सरनाईक यांनी मंगळवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.