शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

एकाच पोलीस ठाण्यात दोनऐवजी पुन्हा सहा वर्षे

By admin | Updated: May 24, 2014 01:01 IST

पोलिसांत आनंद : राज्याचे पोलीस महासंचालक दयाल यांचा आदेश

कोल्हापूर : एकाच पोलीस ठाण्यात दोन वर्षांऐवजी आता पुन्हा सहा वर्षे सेवा करण्याचा आदेश आज, शुक्रवारी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी जारी केला. आज हा नवा आदेश आल्याचे समजताच पोलीस कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. दोन आठवड्यांपूर्वी सहा वर्षांऐवजी एकाच विभागात चार वर्षे सेवा, तर एकाच पोलीस ठाण्यात दोन वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना सेवा बजावता येणार नाही, असा आदेश काढला होता. दरम्यान, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या बदल्यांबाबत दयाल यांच्याकडे दोन वर्षांऐवजी पुन्हा पोलीस कर्मचार्‍यांची सहा वर्षे करावी, अशी विनंती केली होती. १ फेब्रुवारी २०१४ रोजी राज्यातील पोलीस ठाण्यामधील ज्या कर्मचार्‍यांची सहा वर्षांपेक्षा जास्त सेवा झाली आहे त्यांच्या बदल्यांचे गॅझेट निघाले होते. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या होतात. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे बदल्यांची प्रक्रिया रखडली होती. दोन आठवड्यांपूर्वी दयाल यांनी एकाच विभागात चार वर्षे, तर एकाच पोलीस ठाण्यात दोन वर्षे सेवा करता येणार नाही, असा आदेश काढला होता. या आदेशामुुळे पोलीस ठाण्यातील सुमारे ८० पोलीस कर्मचार्‍यांना बदलून इतरत्र ठिकाणी जावे लागणार होते. दरम्यान, जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांतील ज्या पोलीस कर्मचार्‍यांची सेवा दोन वर्षे पूर्ण झाली आहे, अशा कर्मचार्‍यांच्याकडून बदल्यांसाठी पोलीस प्रशासनाच्या आस्थापना विभागाकडे १५ मेपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. नव्या आदेशामुळे त्यांच्या बदल्या आता होणार नाहीत. (प्रतिनिधी)