शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

सिंगलसाठी सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST

गडहिंग्लज : मराठी विज्ञान परिषद व तालुका अध्यापक संघटना आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित ...

गडहिंग्लज : मराठी विज्ञान परिषद व तालुका अध्यापक संघटना आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली रांगोळी स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. एस. के. नेर्ले यांनी दिली.

-------------------------

२) ‘रवळनाथ’ची यात्रा रद्द

चंदगड : चंदगड, आजरा व खानापूर तालुक्यांचे आराध्य दैवत असलेल्या श्री रवळनाथ देवालयाची ३ मार्च रोजी होणारी वार्षिक यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती ट्रस्टचे सचिव मधुकर देसाई यांनी दिली. यात्रेच्या दिवशी मंदिर व परिसरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नसून, मानकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत केवळ धार्मिक विधी व पूजा होईल.

--------------------------

३) स्वरा व आरोही गुरव प्रथम

गडहिंग्लज : येथे ‘आम्ही बंटी दा प्रेमी’ यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ‘कोरोना’ विषयावरील शॉर्ट अ‍ॅक्ट स्पर्धेत स्वरा गुरव व आरोही गुरव यांनी प्रथम क्रमांकाचे ३ हजारांचे बक्षीस पटकाविले. त्यांना नगराध्यक्ष स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, नगरसेविका वीणा कापसे, क्रांतीदेवी शिवणे, सुनीता पाटील, नरेंद्र भद्रापूर, नितीन देसाई, राजेंद्र मांडेकर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

--------------------------

४) ‘अथर्व-दौलत’कडून ऊस बिले जमा

चंदगड : हलकर्णी येथील ‘अथर्व-दौलत’ साखर कारखान्याकडे ३१ जानेवारीअखेर गाळप केलेल्या उसाची बिले सभासदांच्या खात्यावर व तोडणी वाहतूकदारांचीही बिले बँक खात्यात जमा केल्याची माहिती अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली.

दरम्यान, यंदा ऊसतोड मजुरांचा तुटवडा असल्याने तालुक्यात अद्यापही बऱ्याच ठिकाणी उसाची तोड शिल्लक आहे. जे शेतकरी स्वत: तोडणी व वाहतूक करू इच्छितात त्यांनी कारखाना गट कार्यालयाशी संपर्क साधावा.

आजअखेर ४ लाख ५ हजार मे. टन गाळप झाले असून, कंपोष्ट खताची ६३० रुपयांप्रमाणे प्रतिटन विक्री कारखाना साईटवर सुरू आहे. कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळ झाल्यानंतर कारखाना बंद होईल, असेही कंपनी व्यवस्थापनाने सांगितले.

--------------------------

५) महागावात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

महागाव : महागाव (ता. गडहिंग्लज) येथे अध्ययन क्लासेसतर्फे गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केलेल्या समृद्धी पाटील, गौरव करवळ, वरद तेली, पृथ्वीराज पाटील, अथर्व पाटील, वेदांत घाटके, वेदांत कांबळे, सिद्धार्थ तेली, रेहान मुगळे, आयान मुगळे, पृथ्वीराज चव्हाण, सिद्दीक बागवान या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी श्रीशैल पाटील, आण्णासाहेब पाटील, अर्जुन दिवटे, बसवराज देशमुख, चंद्रकांत पाटील, संजय तेली, शरद गुरव आदी उपस्थित होते.

--------------------------

६) बसर्गेत बुधवारी फुटबॉल स्पर्धा

हलकर्णी : बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथे बुधवार (२४) खुल्या सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास ११ हजार तर उपविजेत्या संघास ९००१ व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

--------------------------

७) राजवीर गडकरीला सुवर्णपदक

चंदगड : येथील राजवीर मनोहर गडकरी याने हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कुंग फू आणि कराटे चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेत १५०० स्पर्धकांनी भाग घेतला होता.

--------------------------

८) होसूर येथे विविध स्पर्धांना प्रतिसाद

कोवाड : होसूर (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, ना. सि. पाटील विद्यालय व बी. एस. पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा झाल्या. यावेळी सरपंच राजाराम नाईक, उपसरपंच छाया पाटील, एम. आर. पाटील, के. एम. पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

--------------------------

९) गडहिंग्लजमध्ये सूर्यनमस्कार दिन

गडहिंग्लज : येथील स्वामी विवेकानंद योग व ध्यान केंद्रातर्फे रथसप्तमी व सूर्यनमस्कार दिन पार पडला. प्राचार्य सुरेश चव्हाण, योगशिक्षक राम पाटील यांच्या हस्ते ओंकार प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी संदीप कागवाडे, सुरेखा कळसगोंडा, जान्हवी जोशी, साधना पोवार, सविता पाटील आदी उपस्थित होते.