Kolhapur Crime: चांदीच्या मूर्ती चोरून पळाली; सीसीटीव्हीमुळे वृद्धा सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:35 IST2025-09-26T18:33:34+5:302025-09-26T18:35:46+5:30
देवांच्या मूर्ती स्वच्छ करून ठेवल्या होत्या बाहेर

Kolhapur Crime: चांदीच्या मूर्ती चोरून पळाली; सीसीटीव्हीमुळे वृद्धा सापडली
जयसिंगपूर : येथील अजिंक्यतारा हाउसिंग सोसायटी येथून चांदीच्या देवाच्या मूर्ती चोरणारी वृद्धा सीसीटीव्ही फुटेजमुळे सापडली. प्रभा दत्तात्रय महाडिक (वय ६८, रा. कोरेगावकर कॉलनी, पुलाची शिरोली, ता.करवीर) असे तिचे नाव असून, तिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिच्याकडून मुद्देमाल जप्त केला.
मंगळवारी (दि. २३) फिर्यादी अनघा अनिल कुलकर्णी यांनी घरातील चांदीच्या वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती स्वच्छ करून बाहेर ठेवल्या होत्या. त्या चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाने तपासयंत्रणा राबविली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर फुटेजमध्ये संशयित महिला आढळून आली. जयसिंगपूर बसस्थानकावर या चांदीच्या वस्तू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडील पिशवीची तपासणी केल्यानंतर चांदीच्या मूर्ती मिळून आल्या. पोलिसांनी तिला अटक केली.