शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘श्यामची आई’चा लळा कायम

By admin | Updated: June 11, 2015 00:14 IST

अन्य साहित्याकडे मात्र पाठ : वर्षाकाठी १५ हजार पुस्तकांची विक्री

इंदुमती गणेश - कोल्हापूर -हॅरी पॉटर, स्पायडर मॅन, कार्टूनचे विश्व आणि कॉमिक्सच्या भूलभूलैयातही बालसंस्कार आणि शिक्षणाचा मूलभूत पाया असलेल्या साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाची आजही बालकांवर मोहिनी कायम आहे. कोल्हापुरात वर्षाकाठी ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या १५ हजारांहून अधिक प्रतींची विक्री होते. मात्र, दुसरीकडे साने गुरुजींच्या अन्य साहित्याकडे वाचकांनी पाठ फिरविली आहे. संस्कार म्हणजे बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठ्यांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे; पण हे संस्कार एका पिढीतून दुस-या पिढीत रुजविण्यासाठीचा अनमोल ठेवा साने गुरुजी यांनी ‘श्यामची आई’च्या रूपाने लिहून ठेवला आहे. नाशिकला तुरुंगात असताना साने गुरुजींंनी आईच्या आठवणी पाच दिवसांत लिहून काढल्या. ‘श्यामची आई’ पुस्तकावर कितीतरी पिढ्या संस्कारक्षम झाल्या. आईबद्दलचे असणारे प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात आहेत. हे पुस्तक पहिल्यांदा १९३५ साली प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या तीन लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. एकविसाव्या शतकात जीवनशैलीत बदल झाला असला तरी बालसंगोपनात संस्कारांची मूल्ये रुजविली जातात. म्हणूनच गेल्या ८० वर्षांत या पुस्तकाच्या खपावर परिणाम झालेला नाही. आजही शालेय विद्यार्थ्यांना भेट म्हणून याच पुस्तकाची मागणी केली जाते. कोल्हापुरात या पुस्तकाची वर्षाकाठी किमान १५ हजार प्रतींची विक्री होते. एकीकडे आजही या पुस्तकाचा विक्रमी खप असला तरी साने गुरुजींनी लिहिलेली अन्य बाल संस्कारक्षम पुस्तके व चळवळीत काम करतानाचे लेखन अशा अन्य साहित्याकडे मात्र वाचकांनी पाठ फिरविली आहे. विक्री की वाचनही‘श्यामची आई’, या पुस्तकाचा खप जास्त असला तरी त्याच्या वाचनाबद्दल संभ्रमावस्था आहे. पुस्तक वाचायचेच आहे, या उद्देशाने त्याची खरेदी होत नाही. विद्यार्थ्यांना बक्षीसरूपाने किंवा भेट म्हणून हे पुस्तक दिले जाते. संस्कार म्हणून हे पुस्तक मानदंड असले, तरी तत्कालीन भाषा आणि आज वापरल्या जाणाऱ्या भाषेत फरक असल्याने हे पुस्तक वाचण्यात उदासीनता असल्याचे काही प्रकाशकांचे मत आहे. बालकुमार साहित्यामध्ये ‘श्यामची आई’ हे पुस्तक आजही आवर्जून वाचले जाते. पुस्तक जुने असले तरी त्यातील सुसंस्कार हे आजच्या काळाशीही सुसंगत असल्याने आजही प्रकाशनावर परिणाम झालेला नाही.- अनिल मेहता,मेहता पब्लिशिंग हाऊस