शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
5
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
6
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
7
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
8
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
9
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
10
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
11
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
12
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
13
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
14
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
15
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
16
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
17
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
18
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
19
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
20
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे लाखो भाविक उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 1:45 PM

 श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे  आज श्री दत्त महाराजांच्या राजधानीत आज सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार. जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक उपस्थित आहेत.

ठळक मुद्देश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे लाखो भाविक उपस्थित आज सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी  : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज श्री दत्त महाराजांच्या राजधानीत आज सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार. जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक उपस्थित आहेत.

आज दत्तजयंती निमित्य श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले होते. मंदिरात पहाटे ४.०० वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा यावेळेत अनेक भक्तांनी श्रीना पंचामृत अभिषेक पूजा केली.दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा करणेत आली.  दत्तजयंती निमित्य पालखी व दत्त मंदिर परिसर पुणे येथील शेखर शिंदे व परिवार आदी यांनी आकर्षक फुले व पानांनी मंदिर परिसरात फुलांचे झुंबर, माळा आदींनी सजविला होता.कर्नाटक येथील बोरगाव, उगार, चिकोडी तसेच सांगली, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर आदी भागातून हजारो भक्त व महिला चालत येवून पहाटेच दत्त मंदिरात पोहचले होते. सायकल व दुचाकी वरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती.भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देव संस्थान व ग्रामपंचायत मार्फत अनेक सोयी व सुविधा पुरविणेत आल्या होत्या. पहाटे तीन ते पाच च्या सुमारास हजारो तरुण व युवक वर्ग दुचाकी व सायकलने येवून कृष्णा नदीत स्नान करून श्री गुरुदेव दत्त च्या गजरात दत्त दर्शन घेतले. गुरुदत्त शुगरचे माधवराव घाडगे यांनी यांनी श्री दत्त देव संस्थानला आजच्या महाप्रसादासाठी दोन लाखाची देणगी दिली. दत्तजयंती सोहळ्यात भाविकांच्यात मोठा उत्साह दिसून येत होता. दर्शनासाठी आलेल्या महिलांची संख्या ही लक्षणीय होती. पहाटे तीन पासून रात्री उशिरापर्येंत भाविकांनी गर्दी केली. येथील प्रसिध्द पेढ्यासोबत खवा, बासुंदी, आंबा बर्फी, कवठबर्फी, करदंठ आदी मिठाई भाविकांनी खरेदी केली.भजनी मंडळामुळे वातावरण भक्तीमय

ठिकठिकाणाहून वाद्यसाहित आलेल्या अनेक भजनी मंडळाने भजने सादर केली. त्याला भाविकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. भाविक भजनात सामील झाल्यामुळे येथील वातावरण भक्तिरसात न्हावून निघाले.पार्किंग फुल्ल

पार्किंगची जागा वाढवूनसुद्धा येथील पार्किंग फुल्ल झाले. दुचाकीची संख्या वाढलेने गावातील गल्लोगल्ली दुचाकी पार्क करणेत आल्या होत्या.

टॅग्स :Datta Mandirदत्त मंदिरkolhapurकोल्हापूर